राहुल द्रविड (Photo Credit: Getty)

'द वॉल' राहुल द्रविडने (Rahul Dravid) क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याचा पराभव करून मोठे स्थान मिळवले आहे. द्रविडची गेल्या 50 वर्षात भारताचा महान कसोटी फलंदाज म्हणून निवड करण्यात आली आहे. फेसबुकवर भारताच्या महान कसोटी फलंदाजासाठी विस्डेन इंडियाच्या (Wisden India) वतीने मतदान घेण्यात आले, ज्यात माजी कर्णधार आणि नंबर 3 फलंदाज द्रविडने बाजी मारली. द्रविड यांना एकूण मतांपैकी 52 टक्के मतं मिळाली, तर सचिनला मंगळवार सकाळपर्यंत 48 टक्के मते मिळाली. अंतिम फेरीसाठी सुमारे 11 हजार 400 चाहत्यांनी भाग घेतला. विस्डेनने 16 भारतीय फलंदाजांची निवड केली होती, ज्यापैकी चार फलंदाज उपांत्य फेरीसाठी निवडले गेले. यामध्ये द्रविड आणि सचिन समवेत सुनील गावस्कर आणि विराट कोहली यांचा समावेश होता. द्रविड आणि तेंडुलकर यांच्यात ही कठीण लढत पाहायला मिळाली पण अखेरीस द्रविडने मास्टर-ब्लास्टरला पराभूत करून ताज मिळवला. (सचिन तेंडुलकरला 100 शतक पूर्ण करू न दिल्याने मिळाली जीवे मारण्याची धमकी, 2011 टेस्ट मॅचचा इंग्लंड गोलंदाजाने सांगितला किस्सा)

तिसऱ्या स्थानासाठी गावस्कर आणि विराटमध्ये देखील जोरदार लढत पाहायला मिळाली. गावस्कर यांनी तिसरे स्थान मिळवले तर कोहलीला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. गावस्कर, कोहली, द्रविड आणि तेंडुलकर या प्रत्येकाला खेळाच्या प्रदीर्घ स्वरुपात विशेष स्थान आहे. सचिनने फलंदाज म्हणून सर्वाधिक 15,921 धावा केल्या आहेत, तर 13288 धावांसह द्रविड चौथ्या स्थानावर आहे.

दुसरीकडे, खरे लिटल मास्टर,गावस्कर हे खेळाच्या इतिहासातील 10,000 धावांचा टप्पा ओलांडणारे पहिले फलंदाज होते. कारकीर्दीत अजूनही बराच वेळ शिल्लक असलेला कोहली निवृत्ती जाहीर करण्यापूर्वी क्रिकेटमधील काही सर्वात मोठे विक्रम मोडणारा फलंदाज बनू शकतो.