Brandon King And Keacy Carty (Photo Credit - X)

West Indies Cricket Team vs England National Cricket Team 3rd ODI 2024 Scorecard: वेस्ट इंडिज क्रिकेट संघ विरुद्ध इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाऊन, बार्बाडोस येथे खेळवला गेला. या निर्णायक सामन्यात वेस्ट इंडिजने इंग्लडंचा 8 गडी राखून पराभव करत मालिकेवर कब्जा केला आहे. इंग्लंडने विजयासाठी वेस्ट इंडिससमोर 264 धावांचे लक्ष्य ठेवले होते. वेस्ट इंडिजने 43 षटकात दोन गडी गमावून 267 धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून ब्रँडन किंग आणि केसी कार्टी यांनी शतके झळकावली. (हे देखील वाचा: Afghanistan Beat Bangladesh, 1st ODI Match Scorecard: पहिल्या वनडेत अफगाणिस्तानने बांगलादेशचा 92 धावांनी पराभव केला, अल्लाह गझनफरने घेतल्या 6 विकेट, AFG ची मालिकेत 1-0 ने घेतली आघाडी)

येथे पाहा वाचा संपूर्ण स्कोरकार्ड

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंड संघाने 8 गडी गमावून 263 धावा केल्या. या सामन्यात इंग्लंडची सुरुवात खूपच खराब झाली होती. इंग्लंडने पहिल्या 6 षटकात 18 धावांत 3 विकेट गमावल्या. इंग्लंडकडून फिल सॉल्टने 108 चेंडूत सर्वाधिक 74 धावांची खेळी खेळली. याशिवाय डॅन मौसलीने 57 धावा, सॅम करनने 40 धावा, जोफ्रा आर्चरने 38 धावा, जेमी ओव्हरटनने 32 धावा, कर्णधार लियाम लिव्हिंगस्टोनने 6 धावा आणि विल जॅकने 5 धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून मॅथ्यू फोर्डने 10 षटकांत 35 धावांत सर्वाधिक 3 बळी घेतले, तर अल्झारी जोसेफ आणि रोमॅरियो शेफर्ड यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. याशिवाय रोस्टन चेसला एक विकेट मिळाली.

ब्रँडन किंग आणि केसी कार्टीचा कहर

264 धावांचा पाठलाग करताना नॉर्थ वेस्ट इंडिजने 43 षटकांत 2 गडी गमावून लक्ष्य गाठले. वेस्ट इंडिजसाठी किसी कार्टीने 114 चेंडूत नाबाद 128 धावांची सर्वोच्च खेळी केली. याशिवाय ब्रँडन किंगने 117 चेंडूंत 13 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 102 धावा केल्या. तर इंग्लंडकडून रीस टोपली आणि जेमी ओव्हरटन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. आता 10 नोव्हेंबर पासून दोन्ही संघामध्ये टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. वनडे मालिकेतील पराभवानंतर आता इंग्लंड वेस्ट इंडिजला पराभूत करेल का हे पाहणे चाहत्यासाठी पर्वणी असणार आहे.