PC-X

Virat Rohit Retirement: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 सुरू होण्यापूर्वी, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या निवृत्तीबद्दल(Virat Rohit Retirement) बरीच चर्चा झाली. भारतीय क्रिकेटच्या या दोन महान खेळाडूंच्या एकदिवसीय कारकिर्दीतील ही शेवटची स्पर्धा असेल असे मानले जात होते. मात्र, चॅम्पियन्स ट्रॉफीचे (Champions Trophy) विजेतेपद जिंकल्यानंतर कोहली आणि रोहितने या सर्व अफवांना पूर्णविराम दिला आहे. टीम इंडिया चॅम्पियन झाल्यानंतर, किंग कोहली आणि कॅप्टन रोहित यांच्यातील मैदानावरील संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. (Sunil Gavaskar Dances: चेहऱ्यावर बालिश आनंद...75 वर्षीय सुनील गावस्कर टीम इंडियाच्या विजयानंतर थिरकले; व्हिडीओ व्हायरल (Watch Video))

"अजून निवृत्त होत नाही आहोत"

भारताच्या विजयानंतर रवींद्र जडेजा, अर्शदीप आणि हर्षित राणासोबत डान्स करताना दिसला. तर कोहली आणि रोहित स्टंपसोबत दांडिया खेळताना दिसले. सलग दुसऱ्यांदा आयसीसी ट्रॉफी जिंकल्याचा आनंद कोहली आणि रोहितच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.

या जल्लोषात, रोहित-कोहलीचा मैदानावरील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ज्यामध्ये भारतीय कर्णधाराने त्याच्या आणि विराटच्या निवृत्तीबद्दलच्या सर्व अफवांना पूर्णविराम दिला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये, सेलिब्रेशन दरम्यान, रोहित कोहलीला "भाऊ, आम्ही अजून निवृत्त होत नाही आहोत" म्हणाला.