Rohit Sharma Forgets ICC Champions Trophy 2025: भारतीय क्रिकेट संघाने तिसऱ्यांदा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून इतिहास रचला. अंतिम सामन्यात न्यूझीलंडला हरवून भारताने हा मान मिळवला. संपूर्ण स्पर्धेत टीम इंडिया अपराजित राहिली. साखळी फेरीत बांगलादेश, पाकिस्तान आणि न्यूझीलंडचा पराभव केला. त्यानंतर उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा आणि त्यानंतर जेतेपदाच्या सामन्यात न्यूझीलंडचा पराभव केला. हा विजय भारतासाठी खास होता कारण संघाने १२ वर्षांनंतर एकदिवसीय स्वरूपात आयसीसी ट्रॉफी जिंकली. त्याच वेळी, चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर, रोहित शर्माचा एक मजेदार व्हिडिओ व्हायरल झाला. ज्यामध्ये तो पत्रकार परिषदेदरम्यान ट्रॉफी टेबलावर विसरून तेथून निघून जातो. हेही वाचा: Virat Rohit Retirement: ‘भाई हम लोग अभी रिटायरमेंट…’, सर्व अफवांना पूर्णविराम, कोहली-रोहितचा मजेदार संवाद व्हायरल (Video)
रोहित शर्मा चॅम्पियन्स ट्रॉफी विसरला
No way no way this is real
He forgot the trophy😂😂😂😂😂
— Kaivalya Bajpai (@KaivalyaBajpai) March 10, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)