Virat Kohli and Anushka Sharma’s Adorable Moment: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा (ICC Champions Trophy 2025) अंतिम सामना 9 मार्च रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला गेला. जिथे भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि त्याची पत्नी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचे विजयानंतरचे खास क्षण कॅमेऱ्यात कैद झाले. सामन्यादरम्यान, विराट कोहलीने अनुष्का शर्माला (Anushka Sharma) स्टँडमध्ये बसलेले पाहिले आणि तिच्या दिशेने हात हलवला. अनुष्कानेही लगेच हसून विराटकडे हात हलवले. हा खास क्षण सोशल मीडियावर लवकरच व्हायरल झाला. त्यानंतर विराट अनुष्काच्या दिशेने जाऊन तिच्यासोबत बोलतो. तिला मिठी मारतो.
भारताने न्यूझीलंडचा 44 धावांनी पराभव केला होता. तेव्हा अनुष्का देखील स्टेडियममध्ये उपस्थित होती. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओ आणि फोटोवर चाहत्यांच्या मजेदार प्रतिक्रिया येत आहेत.
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा
Happy for my virat and he can finally share that with his anushka📌♥️ pic.twitter.com/gqNDRcVhR3
— simran💙 (@SimranC1609) March 9, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)