
Sunil Gavaskar Dances: दुबईच्या मैदानावर भारताच्या खेळाडूंनी संपूर्ण देशाला सुवर्ण क्षण दिला आहे. टीम इंडिया चॅम्पियन (Champions Trophy 2025) झाल्यावर सर्वांनाच खूप आनंद झाला होता. या आनंदात भारताचे माजी क्रीकेटपटू सुनील गावस्करदेखील (Sunil Gavaskar Dance) स्वतःवर नियंत्रण ठेवू शकले नाहीत आणि भर मैदानात ते लहान मुलासारखे नाचताना दिसले. त्यांच्या त्या कृतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हिडीओत गावस्करच्या चेहऱ्यावर विजयाचा आनंद स्पष्ट दिसतो. गावस्करांना अशा प्रकारे नाचताना पाहून सोशल मीडियावरील प्रत्येकजण आश्चर्यचकित झाला आहे. लहान मुलासारख्या उड्या मारल्या, गोलगोल फिरून त्यांनी आनंद साजरा केला.Virat Kohli: विजयानंतर विराट कोहलीने मोहम्मद शमीच्या आईचा घेतला आशिर्वाद, पायांना केला स्पर्श; व्हायरल व्हिडिओने जिंकली चाहत्यांची मने (Watch Video)
सुनील गावस्कर टीम इंडियाच्या विजयानंतर थिरकले
75 YEAR OLD SUNIL GAVASKAR DANCING ON INDIA'S VICTORY. ❤️pic.twitter.com/IS95b5Vhj8
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 9, 2025
अंतिम सामन्यात कर्णधार रोहित शर्माने 83 चेंडूत 76 धावांची शानदार खेळी केली. श्रेयस अय्यरने 48 धावांची महत्त्वाची खेळी खेळली. केएल राहुलने शेवटच्या षटकांमध्ये 34 धावा करून नाबाद राहिला. गोलंदाजीत वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव यांच्या फिरकीची जादू शिगेला पोहोचली आणि दोघांनीही प्रत्येकी 2-2 बळी घेतले. रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ तीन वेळा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा जगातील पहिला संघ बनला आहे.