
Virat Kohli: भारतीय संघाने रविवारी न्यूझीलंडला हरवून चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy 2025) जिंकून इतिहास रचला. या विजयानंतर मैदानावर बराच वेळ जल्लोष झाला. या सेलिब्रेशनचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दरम्यान, कोहलीचा (Virat Kohli) एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये संघातील खेळाडू केवळ एकमेकांबद्दलच नाही तर एकमेकांच्या कुटुंबांबद्दलही खूप आदर बाळगत असल्याचे दिसून येते. Rohit Sharma on Retirement: रोहित शर्मा एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होणार नाही, पत्रकार परिषदेत केले स्पष्ट
विजयानंतर, खेळाडूंना स्टेजवर बोलावण्यात आले आणि त्यांना कोट आणि पदके देण्यात आली. यानंतर कोहली आणि शमी मैदानावर एकत्र होते. त्यावेळी शमीची आई कोहलीसमोर आली. कोहलीने त्यांच्या पायांना स्पर्श करूव आशिर्वाद घेतला. शमीच्या आईने त्याच्या पाठीवर हात ठेवून त्याला आशीर्वाद दिला.
सोशल मीडियावर त्या व्हिडीओला चाहत्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. एका युजरने लिहिले की, 'फोटो क्लिक करण्यापूर्वी कोहलीने शमीच्या आईचे पाय स्पर्श केले.' ज्या खेळाडूचे त्याच्या वृत्तीच्या आधारे मूल्यांकन केले जाते त्याच्या आत खूप मूल्ये असतात.
विराटने मोहम्मद शमीच्या आईच्या पायांना केला स्पर्श
virat touching mohammed shami's mother feet ❤️❤️ pic.twitter.com/FxvGDZGP4R
— Bewda babloo 🧉 (@babloobhaiya3) March 9, 2025
दुसऱ्या एका वापरकर्त्याने लिहिले, 'किती सुंदर हावभाव.' दुसऱ्या एका युजरने लिहिले, 'विराट कोहलीने शमीच्या आईचे पाय स्पर्श केले.' 'तो किती सुंदर आणि खरा माणूस आहे. तो एक उत्तम खेळाडू देखील आहे.'