
Savitribai Phule Punyatithi 2025 Messages: सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातील नायगाव येथे झाला. त्यांचे जन्मस्थान शिरवळपासून सुमारे 15 किमी आणि पुण्यापासून 50 किमीअंतरावर आहे. सावित्रीबाई फुले या समाजसुधारक आणि भारतातील महिला शिक्षणाच्या प्रणेत्या होत्या. त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिकांपैकी एक होत्या आणि त्यांनी त्यांचे पती ज्योतिराव फुले यांच्यासोबत मुलींसाठी अनेक शाळा उघडल्या.
10 मार्च 1897 रोजी सावित्रीबाई फुले यांचे निधन झाले. दरवर्षी या दिवशी देश त्यांचे स्मरण करतो आणि श्रद्धांजली अर्पण करतो. सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त तुम्ही देखील सोशल मीडीयात व्हॉट्सॅप, फेसबूक स्टेटस, मेसेजद्वारे त्यांना श्रद्धांजली अर्पण करू शकता.






सावित्रीबाई फुले एक समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री होत्या, ज्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिकांपैकी एक मानल्या जातात. त्यांचे पती ज्योतिराव फुले यांच्यासोबत, त्यांनी भारतातील महिला हक्क आणि शिक्षण सुधारण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. यासाठी त्यांना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते.