Layoffs Representative Image (Photo Credit: Pixabay)

DHL Layoffs 2025: जर्मन लॉजिस्टिक्स कंपनी डीएचएल (German Logistics Company DHL) ने एक मोठी घोषणा केली आहे. डीएचएल यावर्षी 8 हजार कामावरून काढून टाकणार आहे. 2027 पर्यंत 1 अब्ज युरो पेक्षा जास्त बचत करण्यासाठी डीएचएलने यावर्षी 8 हजार नोकऱ्या कमी (Job Cut) करण्याची घोषणा केली आहे. जर्मन लॉजिस्टिक्स कंपनीने त्यांचा वार्षिक ऑपरेटिंग नफा 7.2% ने कमी झाल्याचे नोंदवले. ही कपात DHL च्या पोस्ट आणि पार्सल जर्मनी विभागात केली जाईल. ही कर्मचारी कपात एकूण कर्मचाऱ्यांच्या 1 टक्क्यांपेक्षा जास्त असेल. कंपनीचा हा निर्णय कंपनीच्या 'फिट फॉर ग्रोथ' कार्यक्रमाचा एक भाग आहे.

डीएचएल 8 हजार कर्मचाऱ्यांना देणार नारळ -

डीएचएलचे सीईओ टोबियास मेयर यांनी सांगितले की, डीएचएलच्या मते, कंपनी जगभरातील 220 हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये अंदाजे 602,000 लोकांना रोजगार देते. कंपनीच्या पोस्ट आणि पार्सल जर्मनी विभागात 190,000 कर्मचारी आहेत. वाढत्या किमती आणि कागदपत्रांच्या कमतरतेमुळे पोस्ट आणि पार्सल विभाग अडचणींचा सामना करत आहे. तथापि, मेयर म्हणाले की, डीएचएलचा विभाग विकण्याचा कोणताही हेतू नाही. डीएचएलमध्ये नोकऱ्या कपातीचे एक कारण म्हणजे मंगळवारी व्हर्डी कामगार संघटनेसोबत झालेला वेतन करार, ज्यामध्ये 5 % वेतनवाढ आणि अतिरिक्त सुट्टीचे दिवस समाविष्ट होते. (हेही वाचा - Infosys Salary Hike 2025: इन्फोसिसने जाहीर केली 5-8 टक्के पगारवाढ; पूर्वीपेक्षा कमी, कर्मचारी नाराज)

या करारामुळे 2026 च्या अखेरीस आम्हाला अंदाजे 360 दशलक्ष युरो खर्च येईल, असेही मेयर यांनी सांगितले. 2025 मध्ये जागतिक राजकीय आणि आर्थिक परिस्थिती अस्थिर राहील अशी आमची अपेक्षा आहे, असेही मेयर यांनी एका निवेदनात म्हटले आहे. 2025 साठी, कंपनीला 6 अब्ज युरोपेक्षा जास्त ऑपरेटिंग नफा अपेक्षित आहे, जो विश्लेषकांच्या 6.29 अब्ज युरोच्या अंदाजापेक्षा कमी आहे. (हेही वाचा -Indian Tech Industry Jobs: आर्थिक वर्ष 2025 मध्ये भारतीय तंत्रज्ञान उद्योग 1.25 लाख नोकऱ्या निर्माण करेल- NASSCOM Report)

कंपनीची आर्थिक कामगिरी -

दरम्यान, 2024 मध्ये कंपनीचा ऑपरेटिंग नफा (EBIT) 5.89 अब्ज युरो होता, जो अंदाजापेक्षा थोडा चांगला होता. तथापि, 2025 साठी कंपनीने 6 अब्ज युरोपेक्षा जास्त ऑपरेटिंग नफा अपेक्षित केला आहे, जो तज्ञांच्या 6.29 अब्ज युरोच्या अंदाजापेक्षा कमी आहे. या काळात, कंपनीला जागतिक राजकीय आणि आर्थिक परिस्थिती अस्थिर राहण्याची अपेक्षा आहे. गुंतवणूकदारांना परतावा देण्याचे धोरण सुरू ठेवत कंपनीने प्रति शेअर 1.85 युरो स्थिर लाभांश देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.