
IIFA Digital Awards 2025 Winners List: जयपूरमध्ये झालेल्या 25 व्या आयफा अवॉर्ड्स (IIFA Digital Awards 2025) मध्ये अनेक बॉलिवूड स्टार्संनी हजेरी लावली. यावर्षी आयफा देखील रौप्यमहोत्सव साजरा करत आहे. शनिवारी रात्री डिजिटल पुरस्कार सोहळा पार पडला. समारंभात अनेक विजेत्यांची घोषणा करण्यात आली आणि त्यांना पुरस्कार देण्यात आले. या समारंभात 'अमर सिंह चमकिला' (Amar Singh Chamkila) आणि 'पंचायत' (Panchayat) या वेब सिरीजना सर्वाधिक पुरस्कार मिळाले. या पुरस्कार सोहळ्यात कोणाला कोणता पुरस्कार मिळाला ते जाणून घेऊयात.
सर्वोत्कृष्ट चित्रपट -'अमर सिंह चमकिला' ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला. पंजाबी गायकावर आधारित बायोपिकमध्ये दिलजीत दोसांझने मुख्य भूमिका साकारली आहे.
प्रमुख भूमिकेतील सर्वोत्तम कामगिरी (पुरुष) -नेटफ्लिक्सच्या 'सेक्टर 36' चित्रपटासाठी अभिनेता विक्रांत मॅसीला सर्वोत्कृष्ट मुख्य भूमिकेतील (पुरुष) पुरस्कार मिळाला.
प्रमुख भूमिकेतील सर्वोत्तम कामगिरी (महिला)
नेटफ्लिक्सच्या मिस्ट्री थ्रिलर 'दो पट्टी' साठी कृती सॅननला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक -
'अमर सिंह चमकिला' साठी, त्याचे दिग्दर्शक इम्तियाज अली यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला.
सर्वोत्कृष्ट कथा -'दो पट्टी' या चित्रपटासाठी कनिका ढिल्लनला सर्वोत्कृष्ट कथा पुरस्कार मिळाला.
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता (पुरुष)
विक्रांत मॅसीचा सहकलाकार दीपक डोब्रियालला 'सेक्टर 36' साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा (पुरुष) पुरस्कार मिळाला.
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता (महिला)
'बर्लिन' चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी अभिनेत्री अनुप्रिया गोएंका यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री (महिला) पुरस्कार देण्यात आला.
वेब सिरीज विभागात कोणाला कोणता पुरस्कार मिळाला?
- सर्वोत्कृष्ट सिरिज – पंचायत 3
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - दीपक कुमार मिश्रा (पंचायत 3)
- प्रमुख भूमिकेत सर्वोत्कृष्ट कामगिरी (पुरुष) - जितेंद कुमार (पंचायत 3)
- प्रमुख भूमिकेत कामगिरी (महिला) - श्रेया चौधरी (बँडिश बँडिट्स सीझन 2)
- सहाय्यक भूमिकेत कामगिरी (पुरुष) - फैसल मलिक (पंचायत 3)
- सहाय्यक भूमिकेत कामगिरी (महिला) - संजीदा शेख (हीरामंडी)
- सर्वोत्कृष्ट कथा (मूळ) - पुनीत बत्रा (कोटा फॅक्टरी 3)
- सर्वोत्कृष्ट रिअॅलिटी आणि सर्वोत्कृष्ट नॉन-स्क्रिप्टेड मालिका - फॅब्युलस लाईव्हज विरुद्ध बॉलीवूड वाइव्हज
- सर्वोत्कृष्ट डॉक्यु सिरीज/डॉक्यु फिल्म - हनी सिंग
आज आयफा अवॉर्ड्समध्ये अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांच्या सुपरहिट चित्रपट 'शोले'चा 50 वा वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे आणि त्याचे प्रदर्शन प्रसिद्ध राज मंदिर चित्रपटगृहात केले जाईल. कार्तिक आर्यन या अवॉर्ड शोचे सूत्रसंचालन करणार आहे. तसेच, करीना कपूर या पुरस्कार सोहळ्यात सादरीकरण करताना दिसणार आहे.