सोमवारी सकाळी न्यू यॉर्कला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला बॉम्बची धमकी मिळाली. यानंतर, सुरक्षेच्या कारणास्तव विमान परत मुंबईला परतले. जेव्हा ते मुंबई विमानतळावर सुरक्षितपणे उतरले तेव्हा त्यात एकूण 303 प्रवासी आणि 19 क्रू मेंबर्स होते. सुरक्षा एजन्सींकडून विमानाची सक्तीची तपासणी करण्यात आली. एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, आज 10 मार्च 2025 रोजी एआय119 मुंबई-न्यू यॉर्क (जेएफके) विमानाच्या उड्डाणादरम्यान संभाव्य सुरक्षा धोका आढळून आला. आवश्यक प्रोटोकॉलचे पालन केल्यानंतर, विमानातील सर्व प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विमान परत मुंबईत आणण्यात आले. विमानाने मुंबईहून पहाटे 2 वाजता उड्डाण केले आणि सकाळी 10.25 वाजता परतले. एआय-119 ला मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते न्यू यॉर्कमधील जॉन एफ केनेडी विमानतळापर्यंतचा प्रवास पूर्ण करण्यासाठी सुमारे 15 तास लागतात. एअर इंडियाने सांगितले की, विमान आता उद्या सकाळी 5 वाजता उड्डाण करेल. एअर इंडियाने असेही म्हटले आहे की, प्रवाशांना विश्रांतीची जागा, जेवण आणि इतर मदत पुरवण्यात आली आहे. (हेही वाचा: Air India Flight Technical Issue: शिकागोहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये तांत्रिक बिघाड; उड्डाणानंतर 10 तासांनी विमान पुन्हा परतले, प्रवाशांसाठी केली पर्यायी व्यवस्था)

Air India Flight Bomb Threat:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)