PL 2025: इंडियन प्रीमियर लीगमध्ये तंबाखू, दारूशी संबंधित प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष जाहिरातींवर बंदी घाला; केंद्र सरकारने दिले कडक निर्देश

आयपीएलचा आगामी हंगाम 22 मार्चपासून खेळवला जाणार आहे. पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात ईडन गार्डन्सवर खेळला जाईल. 2 महिन्यांहून अधिक काळ चालणाऱ्या या स्पर्धेचा अंतिम सामना 25 मे रोजी खेळला जाईल.

PL 2025: इंडियन प्रीमियर लीगमध्ये तंबाखू, दारूशी संबंधित प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष जाहिरातींवर बंदी घाला; केंद्र सरकारने दिले कडक निर्देश
IPL trophy (Photo credit: X @IPL)

इंडियन प्रीमियर लीगचा 18 वा हंगाम (IPL2025) 22 मार्चपासून सुरू होणार आहे. ही स्पर्धा होम अँड अवे फॉरमॅटमध्ये खेळवली जाईल, ज्यासाठी सर्व संघांनी आपापल्या पातळीवर तयारी सुरू केली आहे. अशात आरोग्य सेवा महासंचालनालयाने (DGHS) आयपीएल अध्यक्षांना आयपीएल दरम्यान तंबाखू आणि अल्कोहोलच्या (Tobacco, Alcohol) जाहिरातींवर, ज्यामध्ये सरोगेट जाहिराती आणि विक्रीचा समावेश आहे, बंदी घालण्याबाबत पत्र लिहिले आहे. आयपीएलचे अध्यक्ष अरुण सिंग धुमल यांना लिहिलेल्या पत्रात, आरोग्य सेवा महासंचालक अतुल गोयल यांनी सर्व कार्यक्रम आणि क्रीडा सुविधांमध्ये तंबाखू आणि अल्कोहोल उत्पादनांची विक्री बंद करण्याची मागणी केली आहे.

पत्रात लिहिले आहे की, सध्या भारतात मधुमेह, फुफ्फुसांचे आजार, कर्करोग यासारखे गंभीर आजार झपाट्याने वाढत आहेत. या आजारांमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण तंबाखू आणि मद्यपान आहे. तंबाखूमुळे होणाऱ्या सर्वाधिक मृत्यूंच्या बाबतीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतात दरवर्षी 14 लाख लोक दारूमुळे मृत्युमुखी पडतात. तरुणांचे आणि क्रिकेट प्रेमींचे आरोग्य लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आले आहे, जेणेकरून या हानिकारक उत्पादनांचा प्रचार कमी करता येईल. तंबाखू आणि अल्कोहोलच्या जाहिरातींवर नियंत्रण ठेवण्याचा सरकार बऱ्याच काळापासून प्रयत्न करत आहे, कारण त्यांचा सार्वजनिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. (हेही वाचा: NZ vs PAK T20I, ODI Series 2025 Full Schedule: चॅम्पियन्स ट्रॉफी संपली आता न्यूझीलंड-पाकिस्तान टी 20 आणि एकदिवसीय मालिका; संपूर्ण वेळापत्रक पहा)

पत्रात लिहिलेले मुख्य मुद्दे-

आयपीएल सामन्यांदरम्यान स्टेडियमच्या आत आणि बाहेर ब्रॉडकास्टिंग प्लॅटफॉर्मवर तंबाखू आणि अल्कोहोलच्या सर्व जाहिरातींवर बंदी घाला.

स्टेडियम आणि आयपीएलच्या ठिकाणी तंबाखू आणि दारूच्या विक्रीवर बंदी.

युवकांसाठी आदर्श म्हणून, क्रीडा जगताशी संबंधित लोकांनी कोणत्याही स्वरूपात दारू आणि तंबाखू कंपन्यांना प्रोत्साहन देऊ नये.

हे पत्र 5 मार्च रोजी लिहिले गेले होते. हे पत्र भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला देखील उद्देशून लिहिले आहे, ज्यामध्ये खेळाडू आणि समालोचकांना अल्कोहोल किंवा तंबाखूजन्य पदार्थांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मान्यता देण्यापासून परावृत्त करण्यास सांगितले आहे.

आयपीएलमध्ये जाहिरातींमधून करोडोंची कमाई-

आयपीएल ही जगातील सर्वात मोठी टी-20 लीग आहे. भारतात या लीगची खूप क्रेझ आहे. प्रत्येक सामन्याच्या तिकिटांसाठी गर्दी असते. एका अहवालानुसार, जिओस्टारने आयपीएल 2025 साठी 4,500 कोटी रुपयांच्या महसूलाचे लक्ष्य ठेवले आहे. असा अंदाज आहे की सर्व 10 संघ प्रायोजकत्व महसूलात सुमारे 13,00 कोटी रुपये कमवू शकतात. आयपीएल सामन्यांदरम्यान तंबाखू इत्यादींच्या जाहिराती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे दाखवल्या जातात. त्याचा तरुण पिढीवर वाईट परिणाम होतो. या जाहिरातींमधून बीसीसीआयलाही खूप पैसे मिळतात. मात्र आता अशा जाहिरातींवर बंदी येऊ शकते.

दरम्यान, आयपीएलचा आगामी हंगाम 22 मार्चपासून खेळवला जाणार आहे. पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात ईडन गार्डन्सवर खेळला जाईल. 2 महिन्यांहून अधिक काळ चालणाऱ्या या स्पर्धेचा अंतिम सामना 25 मे रोजी खेळला जाईल.

(The above story first appeared on LatestLY on Mar 10, 2025 03:02 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).