
Pune Crime News: आंतरराष्ट्रीय महिला दिनी (International Women’s Day 2025) पुणे येथे श्रीमंतीतून आलेल्या मस्तवालपणातून घृणास्पद आणि एकूणच सामाजिक पातळीवर लज्जा उत्पन्न होईल अशी घटना घडली आहे. शहरातील शास्त्रीनगर चौकात एका मद्यधुंद तरुणाने अश्लील वर्तन केले, ज्यामुळे शहरातील महिलांच्या सुरक्षिततेबद्दल (Women’s Safety) नवीन चिंता निर्माण झाली आहे. सदर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, बीएमडब्ल्यू (BMW Incident) कारमधून मित्रासोबत प्रवास करणाऱ्या एका तरुणाने सार्वजनिक ठिकाणी चौकात उभे राहून महिलांसमोर लघुशंका केली. धक्कादायक म्हणजे, त्याने रस्त्याच्या मधोमध गाडी थांबवली आणि जवळ उभ्या असलेल्या महिलांसमोर लघवी केली.
कॅमेर्यात कैद झालेली धक्कादायक घटना
पुणे येथील शास्त्रीनगर चौकातील या तरुणाचे कृत्य एका नागरिकाने आपल्या मोबाईल कॅमेरॅने चित्रीत केले. ज्यामुळे या घटनेचा भांडाफोड झाला. प्रत्यक्षदर्शींच्या मते, तरुण वेगाने वाघोलीच्या दिशेने जात असताना त्याने शास्त्रीनगर चौकात अचानक त्याची बीएमडब्ल्यू थांबवली. पूर्णपणे मद्यधुंद अवस्थेत असलेला हा तरुण अतिशय निर्लज्जपणे आपल्या बीएमडब्ल्यु (BMW) गाडीतून उतरला. त्याने त्याच्या पँटची झिप काढली आणि सार्वजनिक ठिकाणी लघवी केली. त्याच्या या कृत्यामुळे पाहणारे आश्चर्यचकित झाले आणि काहींनी त्याला हटकण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. (हेही वाचा, Rubbing Balm on Victim's Private Parts: गुप्तांगाला बाम चोळून 20 वर्षीय तरुणास बेदम मारहाण, चित्रीकरण करुन व्हिडिओही व्हायरल; Hinjawadi परिसरातील घटना)
बीएमडब्ल्यू कारमध्ये बसलेला या तरुणाचा दुसरा मित्रही अतिशय मद्यधुंद अवस्थेत होता आणि त्यानेही या तरुणास कोणताही अटकाव केला नाही. उलट तो देखील या बेपर्वा वर्तनात सामील झाला. जास्त वेगाने दारू पिऊन गाडी चालवल्याने मोठा अपघात होण्याचा धोका निर्माण झाला होता आणि संबंधित नागरिकांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करूनही, दोघेही व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या व्यक्तीला अश्लील हावभाव करून त्यांच्या आलिशान गाडीतून वेगाने पळून गेले.
स्थानिकांकडून मोबाईलद्वारे घटनेचे चित्रिकरण
उच्चभ्रु तरुणाचे हे बेमुर्वतखोर वर्तन स्थानिक नागरिकांनी मोबाईल कॅमेऱ्याद्वारे चित्रीत केले आणि तातडीने पोलिसांना माहिती दिली. काही नागरिकांनी येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत. संशयितांची ओळख पटविण्यासाठी अधिकारी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज वापरून बीएमडब्ल्यूचा नोंदणी क्रमांक ट्रॅक करत आहेत. पोलिसांनी सांगितले की, आरोपींची ओळख पटविण्यासाठी आम्ही सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण करत आहोत. सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्ये सहन केली जाणार नाहीत आणि कठोर कारवाई केली जाईल.
उच्चभ्रू तरुणाचा मस्तवालपणा
यह वायरल वीडियो पुणे का बताया जा रहा है..
BMW कार में शराब पीते हुए रंगबाजी.
बीच सड़क पर कार रोक कर Urinate करना..
हद तो तब हो गई, जब पैसों का गुरूर इतना की सारी हद्द पार कर दी, वीडियो में देखे.#viralvideo #ViralVideos pic.twitter.com/ErsVKdwuO8
— Vivek Gupta (@imvivekgupta) March 8, 2025
दरम्यन, या घटनेमुळे व्यापक संताप निर्माण झाला आहे, विशेषतः महिलांमध्ये, ज्यांनी पुण्यात सार्वजनिक अश्लीलतेच्या वाढत्या घटनांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. अशा प्रकरणांमध्ये त्वरित कारवाई होत नसल्याकडे अनेकांनी लक्ष वेधले आहे आणि कडक कायदा अंमलबजावणीची मागणी केली आहे. तसेच या धक्कादायक कृत्यानंतर, पुण्यातील नागरिक दारू पिऊन गाडी चालवण्याविरुद्ध कठोर उपाययोजना आणि सार्वजनिक ठिकाणी, विशेषतः रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी करत आहेत.