Maharashtra Budget 2025-26: उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार हे आज, 10 मार्च रोजी राज्याचा वर्ष 2025-26 चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. आज दुपारी 2 वाजता अर्थसंकल्प सादर होण्याची अपेक्षा आहे. नव्याने सत्तेवर आलेल्या महायुती सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प असून, अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांचा हा 11 वा अर्थसंकल्प असणार आहे. त्यानंतर ते शेषराव वानखेडे (13 वेळा) यांच्यानंतर दुसरे सर्वाधिक (11) वेळा अर्थसंकल्प सादर करणारे अर्थमंत्री ठरतील. साधारण 8 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्जाच्या बोजासह मोठ्या आर्थिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प सादर केला जाईल. या अडचणी असूनही, फडणवीस-शिंदे-पवार सरकार निवडणुकीपूर्वीची आश्वासने पूर्ण करताना लोकाभिमुख योजना, पायाभूत सुविधांचा विकास आणि आर्थिक विकास यांचा समतोल साधेल अशी अपेक्षा आहे. मुंबई, पुणे आणि नागपूरसारख्या प्रमुख शहरांमध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे, मतदारांचा पाठिंबा बळकट करण्यासाठी अर्थसंकल्पात प्रमुख कल्याणकारी उपाययोजनांचा समावेश असण्याची अपेक्षा आहे. तुम्ही  विविध वृत्त वाहिन्यांवर राज्याचा यंदाचा अर्थसंकल्प थेट पाहू शकाल. (हेही वाचा: Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना, सरकारकडून तोंडाच्या वाफा, अन् हवेत दांडपट्टा; महिलांमध्ये नाराजी)

Maharashtra Budget 2025-26 Live Streaming:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)