Mass Shooting At Toronto Pub (फोटो सौजन्य -X/@MarioNawfal)

Mass Shooting At Toronto Pub: कॅनडातील टोरंटो (Toronto) येथील एका पबमध्ये सामूहिक गोळीबाराची (Mass Shooting) घटना घडली. एका व्यक्तीने अचानक पबमध्ये गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे लोकांना बाहेर पडण्यासाठी वेळ मिळाला नाही. त्यामुळेच या घटनेत 11 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. पोलिस हल्लेखोराचा शोध घेत आहेत. हा गोळीबार का करण्यात आला? याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

या घटनेची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांने सांगितले की, ही घटना रात्री 10:30 च्या सुमारास प्रोग्रेस अव्हेन्यू आणि कॉर्पोरेट ड्राइव्हजवळ घडली. ही घटना एका स्थानिक पबमध्ये घडली, जिथे काही लोकांनी गोळीबार केला. या घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत. पीडितांच्या प्रकृतीबद्दल कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. (हेही वाचा -US Mass Shooting Video: अमेरिका हादरली! शिकागोमध्ये गोळीबारात 7 जण जखमी, घटनेचा व्हिडिओ व्हायरल)

दरम्यान, संशयित हल्लेखोर अजूनही फरार असल्याची पुष्टी पोलिसांनी केली आहे. गोळीबार करणाऱ्या व्यक्तीची ओळख किंवा पीडितांशी त्याचे संभाव्य नातेसंबंध याबद्दल अधिक माहिती जाहीर केलेली नाही. पोलिसांनी परिसरातील लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही संशयास्पद हालचालींबद्दल तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे. (वाचा - Mass Shooting in US: अमेरिकेच्या ओहायो प्रांतात गोळीबाराचा थरार; एक ठार, 26 जखमी (Watch Video))

सध्या पोलिस आणि अनेक एजन्सी हल्लेखोराचा शोध घेत आहेत. पोलिस प्रत्येक दृष्टीकोनातून या घटनेचा तपास करत आहेत. हल्लेखोराचे कोणाशी वैयक्तिक शत्रुत्व होते का, ज्यामुळे पबमध्ये गोळ्या झाडण्यात आल्या? याचा शोध देखील पोलिस घेत आहेत. अचानक झालेल्या या गोळीबाराच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.