US Mass Shooting Video: अमेरिकेतील इलिनॉय राज्यातील शिकागो शहरात पुन्हा एकदा गोळीबाराची घटना समोर आली आहे. बॅक ऑफ द यार्ड्स नावाच्या परिसरात झालेल्या या गोळीबारात लहान मुलांसह अनेक जण जखमी झाले. वृत्तानुसार, तीन मुलांसह किमान सात जणांना गोळ्या लागल्या आहेत. सध्या त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती समोर आलेली नाही. घटनेनंतर सुमारे 10 रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या आणि जखमींना रुग्णालयात नेण्यात आले. गोळीबाराचे कारण आणि संशयित याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. घटनास्थळावरून मिळालेल्या छायाचित्रे आणि व्हिडीओमध्ये अनेक पोलिसांची वाहने दिसत आहेत.

पाहा पोस्ट:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)