ट्रेव्हर बेलीस (AP/PTI Photo)

आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वचषकमध्ये न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध सेमीफायनलमध्ये पराभवामुले भारताचे (Indian Team) तिसऱ्यांदा विश्वचषक जिंक्यण्याचे आव्हान संपुष्टात आले. त्यामुळे संघात खेळाडूंमध्ये दुरावा आल्याचे वृत्तनि म्हणले. तर मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांना काही दिवसात बाहेरचा रास्ता दाखवण्यात येणार असल्याचेही बोलले जात आहे. आणि आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआय (BCCI) ने क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफच्या पदाकरिता अर्ज मागवले आहेत. बीसीसीआयने फलंदाजी, गोलंदाजी कोच, मुख्य प्रशिक्षक, फील्डिंग कोच, फिजिओ, सामर्थ्य आणि कंडिशनिंग कोच, आणि प्रशासकीय व्यवस्थापक या पदांसाठी अर्ज मागवले आहे. (टीम इंडिया ला मिळणार नवीन कोच; सपोर्ट स्टाफ आणि मुख्य प्रशिक्षक पदासाठी बीसीसीआय ने मागवले नवीन अर्ज)

शास्त्री यांनी 2017मध्ये टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक पदाची सूत्रे आपल्या हाती घेतली होती. पण त्यांच्या कारकिर्दीत संघाने आयसीसी (ICC) ची एकी मोठी स्पर्धा जिंकत आली नाही. म्हणूनच बीसीसीआयने नवीन प्रशिक्षक नेमण्याची तयारी सुरु केली आहे. तेव्हा, आपण बघूया मुख्य माजी खेळाडू जे भारताचे मुख्य प्रशिक्षक होण्यासाठी योग्य आहेत:

वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag)

vs
वीरेंद्र सेहवाग (Photo Credits: Twitter @virendersehwag)

शास्त्री यांना संघाचा मुख्य प्रशिक्षक बनवण्याआधी माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग भारताच्या प्रशिक्षक पदाचा मुख्य दावेदार होता. सेहवागला या कामात रस आहे जे की संघासाठी चांगली गोष्ट आहे. 2015 पासून 2018 पर्यंत आयपीएल (IPL) संघ किंग्ज इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) चे प्रशिक्षक म्हणून काम करण्याचा सेहवागला अनुभव आहे. सुरुवातीला पंजाबच्या संघाचे प्रशिक्षण देण्याचा सेहवागचा अनुभव काही चांगला नाही पण मागील वर्षी रविचंद्रन अश्विन (R Ashwin) च्या साथीने सेहवागने आपली क्षमता आणि मूल्य सिद्ध करून दाखवले. सेहवागचा आणखी एक फायदा म्हणजे तो एक दिल्ली चा आहे आणि विराट कोहली सोबत त्याचे चांगले व्यवहार आहे जे संघाला त्वरीत पुनर्बांधणी करण्यास मदत करेल.

टॉम मूडी (Tom Moody)

टॉम मूडी (Photo Credit: Tom Moody/Instagram)

मूडी या यादीत सर्वात अनुभवी प्रशिक्षकांपैकी एक आहे कारण त्यांना अनेक क्रिकेट संघांना प्रशिक्षण देण्याचा अनुभव आहे. मूडी पीएसएलमध्ये मुलान सुल्तान (Multan Sultan), बीपीएल (BPL)मध्ये रंगपूर राइडर्स (Rangpur Raiders) आणि आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद (Sunerisers Hyderabad) सारख्या मोठ्या संघाना प्रशिक्षित केले आहेत. आणि त्यांनी इंग्लंडमधील वोरस्टरशायर काउंटीचे संचालक म्हणून काम केले आहे. प्रशिक्षक म्हणून मूडी यांचा सीव्ही प्रभावी आहे. 2007 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत श्रीलंका चे मार्गदर्शन करत त्यांनी क्रिकेट विश्वात आपली उपस्थिती जाणवून दिली. आयपीएलमध्ये मूडी यांच्या अंतर्गत संघाने 2013 पासून 2019 पर्यंतचे प्ले-ऑफ गाठले तर  2016 मध्ये संघाला विजयाचा आस्वाद मिळवून दिला. मूडी फक्त एक विलक्षण रणनीतिकखेळ प्रशिक्षक नाही तर त्यांच्याकडे खूप अनुभवी आहे.

ट्रेव्हर बेलीस (Trevor Bayliss)

ट्रेव्हर बेलीस (AP/PTI Photo)

या कोच सरांना सध्या कोणत्याही परिचयाची आवश्यकता नाही. विश्वचषक विजेता इंग्लंड (England) संघाचे मुख्य प्रशिक्षक सध्या विश्वचषक विजय साजरा करताहेत. बेलीस इंग्लंड संघाचे पहिले कोच आहे ज्यांच्या प्रशिक्षणाखाली संघाने पहिला विश्वचषक जिंकला. मे 26, 2015 ला बेलीस यांना इंग्लंड संघाचा मुख्य प्रशिक्षक नियुक्त केले होते. अँड्र्यू स्ट्रॉसने (Andrew Strauss) वनडे क्रिकेटमध्ये तज्ञ असलेल्या खेळाडूंसाठी जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे बेलीस यांना संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले. बेलीस यांच्या चार वर्षांच्या कालावधीत इंग्लड सध्या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये सर्वोत्तम संघ म्हणून नावलौकिकाला आला आहे. त्यांनी नियमितपणे घर आणि अवे सामन्यात चांगल्या संघाचा पराभव केला आहे. आणि आता त्यांनी जागतिक विजेतेपद देखील मिळाले.

अनिल कुंबळे (Anil Kumble)

अनिल कुंबळे (Photo Credit: Anil Kumble/Instagram)

कुंबळे हे भारतीय क्रिकेटमधील सर्वात मोठ्या नावांपैकी एक आहेत आणि जगातील सर्वोत्कृष्ट स्पिनर पैकी एक आहे. कुंबळेने याआधी आधी देखील भारतीय संघाला प्रशिक्षण दिले आहे पण त्यांची सांगता ज्याप्रकारे झाली ती कोणी विसरू शकणार नाही अशी आहे. भारतीय संघासह कुंबळेचा मागील प्रशिक्षकाचा अनुभव आदर्श ठेवण्यासारखा नव्हता. कर्णधार विराट कोहली (VIrat Kohli) त्याच्यावर नाखूष असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. पण एक प्रशिक्षक म्हणून कुंबळेची कामगिरी सर्वोत्तम होती कारण टीम इंडियाचा कोच म्हणून त्याच्या काळात द्विपक्षीय मालिकेत भारत अपयशी राहिला होता.

यंदा कोहलीच्या कामगिरीने बीसीसीआय नाखूष आहे आणि सतत संघात बदल करत राहिल्यामुळे त्याच्यावर टीका केली जात आहे. त्यामुळे, कर्णधार बदलत बीसीसीआय कुंबळेची प्रशिक्षक म्हणून निवड करू शकतात.

गॅरी कर्स्टन (Gary Kirsten)

गॅरी कर्स्टन

दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रीय संघातील खेळाडू म्हणून गॅरी कर्स्टन हा एक कठोर परिश्रम करणारा खेळाडू म्हणून ओळखले जायचे. आणि त्यांनी आपले प्रशिक्षणाची जबाबदारी देखील तितक्यच्या परिश्रमाने पार पडली. 2008 मध्ये जेव्हा भारताने त्यांना मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले तेव्हा त्यांना एक मोठा धोका मानले गेले कारण त्यांच्याकडे याआधी प्रशिक्षणाचा अनुभव नव्हता. पण कर्स्टन यांची नियुक्ती बीसीसीआयचे मास्टरस्ट्रोक ठरले. त्यांच्या प्रशिक्षणाखाली भारताने तब्बल 37 वर्षांनी आयसीसी विश्वचषक जिंकले आणि टेस्टमध्ये क्रमवारीत नंबर 1 रँकिंग मिळवली. 2011 च्या विश्वचषक स्पर्धेत त्याने दक्षिण आफ्रिकेचा प्रशिक्षक म्हणून पदभार सांभाळला आणि त्यांना देखील आयसीसी टेस्ट क्रमवारीत सर्वोच्च स्थानी नेले. मात्र, 2013 मध्ये कौटुंबिक कारणास्तव त्यांनी राजीनामा दिला. जर त्यांनी यंदा पोस्टसाठी अर्ज केले तर बीसीसीआयने संधी न गमावता त्यांना पुन्हा नियुक्त करावे.

विश्वचषक सेमीफायनलमधून भारताच्या धक्कादायक पराभवानंतर भारतीय संघात विराट कोहली आणि रवी शास्त्री यांची हुकुमशाही असल्याचे बोलले जात आहे. ही गोष्ट आता सर्वांपुढे येत आहे. त्यामुळे शास्त्री यांनी राजीनामा द्यावा किंवा त्यांना पदापासून दूर करावे, असे म्हटले जात आहे.