बीसीसीआय | (Photo Credits: PTI)

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआय (BCCI) ने क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफच्या पदाकरिता अर्ज मागवले आहेत. बीसीसीआयने फलंदाजी, गोलंदाजी कोच, मुख्य प्रशिक्षक, फील्डिंग कोच, फिजिओ, सामर्थ्य आणि कंडिशनिंग कोच, आणि प्रशासकीय व्यवस्थापक या पदांसाठी अर्ज मागवले आहे. सध्याचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांना देखील नव्याने अर्ज करावा लागणार आहे. शास्त्री यांचा करार विश्वचषकनंतर संपणार होता पण वेस्ट इंडिज (West Indies) सामना बघता त्यांना आणखी 45 दिवस प्रशिक्षक पदावर कायम ठेवले आहे. भारताचा वेस्ट इंडीज दौरा 3 ऑगस्ट तर 3 सप्टेंबरपर्यंत आहे. यानंतर गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण, फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर (Sanjay Bangar)आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर (R Sridhar) यांचाही कार्यकाळ संपेल.

आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वचषकच्या सेमीफायनलमधील पराभवानंतर शास्त्रींवर टीका होत आहे. 2017 मध्ये भारताचे माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे (Anil Kumble) यांनी मुख्य प्रशिक्षकपदावरून राजीनामा दिल्यावर टीम इंडियाची सुत्रे शास्त्रींच्या हाती देण्यात आली होती. शास्त्रींच्या काळात भारतीय संघाने आयसीसीची एकही मोठी स्पर्धा जिंकली नाही. मात्र, यंदा जानेवारीमध्ये भारताने त्यांच्या मार्गदर्शनात ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्ध झालेली कसोटी मालिका पहिल्यांदा जिंकण्याचा पराक्रम केला होता.

दरम्यान, इतर स्टाफसोबत टीम मॅनेजर पदासाठी देखील अर्ज मागवले जातील. दुसरीकडे, संघाचे ट्रेनर शंकर बसु आणि फिजिओ पॅट्रिक फरहार्ट यांनी विश्वचषकानंतर आपल्या पदावरून राजीनामा दिला.