
Punjab Kings vs Kolkata Knight Riders Stats: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 31 वा सामना आज पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात (PBKS vs KKR) यांच्यात महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मुल्लानपूर, चंदीगड येथे संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जाणार आहे. या हंगामात, पंजाब किंग्जचे नेतृत्व श्रेयस अय्यर करत आहे. तर, कोलकाता नाईट रायडर्सची कमान अंजिक्य राहणेच्या खांद्यावर आहे. या हंगामात दोन्ही संघाची कामगिरी समिश्र राहिली आहे. पॉइंट टेबलमध्ये कोलकाता पाचव्या तर पंजाब सहाव्या स्थानावर आहे. त्यामुळे दोन्ही संघामध्ये आजचा सामना रोमांचक पाहायला मिळू शकतो.
हेड टू हेड रेकाॅर्ड (PBKS vs KKR Head to Head)
आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात एकूण 33 सामने खेळले गेले आहेत. यापैकी कोलकाता नाईट रायडर्सने 21 सामने जिंकले आहेत, तर पंजाब किंग्ज फक्त 12 वेळा जिंकू शकले आहेत. या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की कोलकाता वरचढ ठरला आहे. तथापि, पंजाब संघ गेल्या काही वर्षांत चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करत आहे आणि यावेळी कठीण लढत अपेक्षित आहे.
आजच्या सामन्यात होऊ शकतात 'हे' अनोखे विक्रम
पंजाब किंग्जचा घातक अष्टपैलू मार्कस स्टोइनिसला आयपीएलमध्ये दोन हजार धावा पूर्ण करण्यासाठी 75 धावांची आवश्यकता आहे.
पंजाब किंग्जचा स्टार युवा फलंदाज नेहल वधेराला आयपीएलमध्ये 500 धावा पूर्ण करण्यासाठी ९७५ धावांची आवश्यकता आहे.
कोलकाता नाईट रायडर्सचा स्फोटक अष्टपैलू खेळाडू वेंकटेश अय्यरला आयपीएलमध्ये 1500 धावा पूर्ण करण्यासाठी 60-75 धावांची आवश्यकता आहे.