Who Will Win PBKS vs KKR? Google Win Probablity च्या अंदाजानुसारा पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात कोणाचा वरचष्मा, TATA IPL 2025 मध्ये आज येणार आमनेसामने
या हंगामात, पंजाब किंग्जचे नेतृत्व श्रेयस अय्यर करत आहे. तर, कोलकाता नाईट रायडर्सची कमान अंजिक्य राहणेच्या खांद्यावर आहे. या हंगामात दोन्ही संघाची कामगिरी समिश्र राहिली आहे. पॉइंट टेबलमध्ये कोलकाता पाचव्या तर पंजाब सहाव्या स्थानावर आहे. त्यामुळे दोन्ही संघामध्ये आजचा सामना रोमांचक पाहायला मिळू शकतो.
Today’s IPL Match 2025, Punjab Kings vs Kolkata Knight Riders: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 31 वा सामना आज पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात (PBKS vs KKR) यांच्यात महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मुल्लानपूर, चंदीगड येथे संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जाणार आहे. या हंगामात, पंजाब किंग्जचे नेतृत्व श्रेयस अय्यर करत आहे. तर, कोलकाता नाईट रायडर्सची कमान अंजिक्य राहणेच्या खांद्यावर आहे. या हंगामात दोन्ही संघाची कामगिरी समिश्र राहिली आहे. पॉइंट टेबलमध्ये कोलकाता पाचव्या तर पंजाब सहाव्या स्थानावर आहे. त्यामुळे दोन्ही संघामध्ये आजचा सामना रोमांचक पाहायला मिळू शकतो.
हेड टू हेड रेकाॅर्ड (PBKS vs KKR Head to Head)
आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात एकूण 33 सामने खेळले गेले आहेत. यापैकी कोलकाता नाईट रायडर्सने 21 सामने जिंकले आहेत, तर पंजाब किंग्ज फक्त 12 वेळा जिंकू शकले आहेत. या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की कोलकाता वरचढ ठरला आहे. तथापि, पंजाब संघ गेल्या काही वर्षांत चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करत आहे आणि यावेळी कठीण लढत अपेक्षित आहे. (हे देखील वाचा: PBKS vs KKR IPL 2025: पंजाब आणि कोलकाता यांच्यातील सामन्यापूर्वी चंडीगडमधील हवामान आणि महाराजा यादविंद्र सिंग स्टेडियमचा खेळपट्टी अहवाल जाणून घ्या)
गुगलनुसार पंजाब किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना जिंकण्याची शक्यता (PBKS vs KKR Google Win Probability)
आज पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स सामन्याच्या विजयाच्या शक्यतांबद्दल बोलायचे झाले तर, गुगलनुसार पंजाब किंग्जला 52% आणि कोलकाता नाईट रायडर्सला 48% विन प्रोबिबिलिटी मिळत आहेत, ज्यामुळे सामना खूप अटीतटीचा होणार आहे हे स्पष्ट होते. दोन्ही संघांकडे असे मजबूत खेळाडू आहेत जे सामन्याचा मार्ग बदलू शकतात. चाहत्यांना एका रोमांचक आणि उच्च धावसंख्या असलेल्या सामन्याची अपेक्षा आहे.
(The above story first appeared on LatestLY on Apr 15, 2025 03:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

