(Photo Credit: Sachin Tendulkar/Twitter)

क्रिकेटच्या मैदानावर आपण अनेक अचंबित करणारे प्रसंग पहिले असतील. पण सध्या सोशल मीडियावर एका क्रिकेट सामन्यांदरम्यानचा व्हिडिओ वायरल होत आहे. हा व्हिडिओ कोणत्या देशातला आहे हे अद्याप केलेले नाही. पण हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही आर्श्चर्याचा धक्काच बसणार आहे. यंदाच्या आयसीसी क्रिकेट विश्वचषकमध्ये अनेक किस्से झाले आहे जेव्हा अंपायरला काय निर्णय द्यावा हेच कळलं नाही. याचे पहिले उद्धरण म्हणजे न्यूझीलंड (New Zealand) आणि इंग्लंड (England) मधील फायनल सामना जिथे बेन स्टोक्स (Ben Stokes) च्या हाताला लागून चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला आणि पंचांनी जास्त धावा बहाल केल्या. असेच काही या सामन्यादरम्यान देखील झाले आहे. (IND vs WI: विराट कोहलीसमोर मोठं आव्हान, वेस्ट इंडिजविरुद्ध टी-20 मध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी हे 4 आहे दावेदार)

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ चर्चेचा विषय बनला आहे. या व्हिडिओमध्ये गोलंदाजाने टाकलेला चेंडू फलंदाला चकमा देत स्टम्प्सला लागला. बेल्स हलले पण पडले नाही. गोलंदाजाने ही अपील देखील केले पण पंचांनी काय निर्णय दिला हे मात्र अजून कळलेले नाही. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने या प्रसंगाचा व्हिडिओ शेअर केला आहे. आणि विचारले की, 'जेर तुम्ही अंपायर असता तर आपण काय निर्णय दिला असता?

दरम्यान, यंदा विश्वचषकमध्ये देखील 3-4 असेच प्रसंग घडले आहे जिथे चेंडू स्टम्पला लागतो पण बेल्स पडत नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होताच नेटिझन्सने देखील यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहे. एका युजरने तर कुमार धर्मसेना यांना निर्णय विचारावा असेही म्हटले आहे. धर्मसेना यांच्या विश्वचषकमधील वादग्रस्त निर्णयावर चाहते चांगले भडकले होते. त्यांनी अनेकदा चुकीचे निर्णय दिले होते. आणि त्यामुळे त्यांना ट्रोलदेखील करण्यात आले होते.