(Photo Credit: Getty)

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे सर्व क्रिकेट स्पर्धा सध्या ठप्प झाल्या आहेत. खेळ पुन्हा एकदा कधी सुरु होतील याचे सर्व चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत आहे. पाच वर्षांपूर्वी आपला अखेरचा सामना खेळल्या माजी गोलंदाजी आशिष नेहराने 2016 मध्ये भारताच्या टी-20 टीममध्ये पुनरागमन केले. केवळ नेहराच नाही तर 2011 मध्ये भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड यालाही वनडे संघात पुन्हा बोलावण्यात आले होते.  त्यानंतर त्याने आणखी पाच वनडे आणि एक टी-20 सामना खेळला. क्रिकेट विश्वात असे अनेक खेळाडू आहेत ज्यांना आपल्या राष्ट्रीय टीममध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. असे विसरलेले खेळाडू नियमितपणे इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (IPL) आणि घरगुती क्रिकेट खेळतात आणि निवड समितीवर जोरदार दबाव आणण्याचा प्रयत्न करतात. काहींना यश मिळत, तर काहींच्या प्रतीक्षेत वाढ होत जाते. (एमएस धोनी याच्या एका निर्णयाने बदलला रोहित शर्मा याचा करिअर, 2013 चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मिळाली होती दुसरी संधी)

त्यापैकी 'हे' 5 खेळाडू भारतीय संघात पुनरागमन करण्यास पात्र आहेत. पाहा खाली.

अंबाती रायुडू

2013 मध्ये भारतीय वनडे टीममध्ये डेब्यू करणाऱ्या रायुडूने अखेरचा सामना 2019 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला. त्याला मागील वर्षीच्या वर्ल्ड कप टीममध्ये संधी न मिळाल्याने नाराज होऊन निवृत्तीही जाहीर केली होती, पण काही महिन्यानंतर निर्णय मागे घेतला. भारतीय संघात मधलीफळी कमकुवत आहे, रिषभ पंतदेखील चौथ्या स्थानावर अपयशी ठरल्याने अनुभवी रायुडूला टीममध्ये परत बोलवावे असे अनेकांना वाटते. आणि तोही पुन्हा एकदा छाप पाडण्यासाठी खूप उत्सुक असेल.

जयदेव उनाडकट

आयपीएल 2017 मधील त्याच्या कामगिरीमुळे उनाडकाटला खेळाच्या सर्वात छोट्या स्वरूपात बोलावण्यात आले होते, पण तिथे अपयश आल्याने तो आता भारत ए कसोटी संघात पुनरागमनच्या प्रयत्नात आहे. उनादकटने रणजी करंडक हंगामात अवघ्या 13 डावात 55 विकेट्स घेतल्या आणि निवडकर्त्यांना प्रभावित केले. निनादस ट्रॉफी 2018 मध्ये उनादकट दोन वर्षांपूर्वी भारतासाठी अखेरचा खेळला होता. संधी मिळाल्यास तो राष्ट्रीय संघात निवडण्यास योग्य असल्याचे सिद्ध करू शकतो.

अजिंक्य रहाणे

टीम इंडियाच्या टेस्ट संघाचा उपकर्णधार रहाणेने 2018मध्ये अखेरचा वनडे सामना खेळला. न्यूझीलंड वनडे दौऱ्यात रोहित शर्माच्या अनुपस्थिती रहाणेला मर्यादित ओव्हरच्या क्रिकेटमध्ये संधी मिळाली नाही. रहाणेने भारताच्या कसोटी संघात नियमित कामगिरी केली आहे. रहाणे एक सलामी फलंदाज आणि मधल्या फळीत फलंदाजी करण्यास सक्षम आहे. अशा स्थितीत एखाद्या खेळाडूला दुखापत झाल्यास भारताला रहाणेच्या रूपात दुहेरी फायदा होऊ शकतो.

केदार जाधव

जाधवने 2014 पुणे सामन्यातून वनडेमध्ये पदार्पण केले. केदारला वर्ल्ड कप संघातही स्थान देण्यात आले होते, पण इथे तो फलंदाजीने अपयशी ठरला. वर्ल्ड कप स्पर्धेत त्याने फक्त एक अर्धशतक ठोकले मात्र, त्यानंतर वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड दौऱ्यावर त्याला मोठा स्कोर करण्यात अपयश आले. आणि आता आगामी आशिया कपमधून टीम इंडियामध्ये पुनरागमन करण्याची त्याला उपयुक्त संधी आहे.

रविचंद्र अश्विन

अश्विनने 2010 मध्ये वनडेत पदार्पण केले आणि 2017 मध्ये अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. अश्विनने नेहमीच खालच्या फळत एक सक्षम फलंदाज म्हणून स्वतःला सिद्ध केले आहे. त्याच्या अनुभवाचा निःसंशयपणे टीम इंडियाला मोठा फायदा होईल.

सुरेश रैना

भारताच्या वर्ल्ड कप विजेत्या टीमचा सदस्य असलेला रैना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यास उत्सुक आहे. त्याने हे अनेकदा बोलूनही दाखवले आहे. पण, त्याला अद्याप संधी मिळाली नाही. 2018 इंग्लंड दौऱ्यावर त्याने अखेरचा सामना खेळला आणि तेव्हापासून तो टीम इंडियातून बाहेर आहे. रैना एक उपयुक्त फलंदाज आहे आणि मधल्याफळीसाठी त्याला संधी मिळू शकते. युवा श्रेयस अय्यरने चौथ्या स्थानावर दावेदारी पक्की केली असली तरी रैना पंतच्या जागी पाचव्या स्थानावर फलंदाज करू शकतो. यामुळे भारतीय इलेव्हन आणखी मजबूत होऊ शकते. रैना, एक प्रभावी क्षेत्ररक्षकही आहे.

कोरोनामुळे सध्या क्रिकेट ठप्प झाले आहे. पण हे संकट दूर झाल्यास हे खेळाडू टीम इंडियामध्ये पुन्हा स्थान मिळवण्यासाठी प्रयत्नशील असतील. निवड समितीने देखील या अनुभवी खेळाडूंकडे लक्ष देणे आवश्यक आहे.