Sunil Gavaskar यांच्या वक्तव्याने पुन्हा गोंधळ, T20 WC साठी टीम इंडियात आर अश्विनच्या निवडीवर केली धक्कादायक टिप्पणी
माजी भारतीय क्रिकेटर सुनील गावस्कर (Photo Credit: PTI)

संयुक्त अरब अमिरातीमध्ये (United Arab Emirates) पुढील महिन्यात होणाऱ्या टी-20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेसाठी चार वर्षांच्या अंतरानंतर भारतीय बोर्डाने अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनला (Ravichandran Ashwin) परत बोलावले. टीम इंडिया निवड समितीच्या या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. अश्विन शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना 2017 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध किंग्स्टन (Kingston) येथे खेळला होता. त्याने आतापर्यंत 46 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 52 विकेट्स घेतल्या आहेत. मात्र, माजी भारतीय कर्णधार सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांना अनुभवी ऑफस्पिनरचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्याबाबतचा निर्णय थोडा साशंकता वाटली. अलीकडेच इंग्लंडविरुद्ध (England) खेळल्या गेलेल्या चार कसोटी सामन्यांमध्ये अश्विनचा कोणत्याही सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश नव्हता. पण विश्वचषकाच्या 15 सदस्यीय भारतीय संघात (Indian Team) त्याची निवड करण्यात आली. (T20 World Cup 2021: पाकिस्तानविरुद्ध मॅचसाठी दिग्गज फलंदाजाने निवडली टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन, अश्विनच्या जागी ‘या’ गोलंदाजाला दिले स्थान)

“अश्विनचे पुनरागमन ही चांगली गोष्ट आहे पण आपल्याला प्रतीक्षा करावी लागेल आणि त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळते का ते पाहावे लागेल. तुम्ही त्याला 15 मध्ये निवडले आहे, ते ठीक आहे, तुम्ही त्याला इंग्लंडमधील संघातही निवडले पण त्याला इलेव्हनमध्ये संधी देत नाही,” गावस्कर स्पोर्ट्स तकवर म्हणाले. “तर, कदाचित त्याला इथे (इंग्लंडमध्ये) झालेल्या निराशाची पूर्तता करण्यासाठी कदाचित सांत्वन म्हणून स्थान दिले गेले असेल. तो इलेव्हनमध्ये खेळेल की नाही हे वेळच सांगेल,” ते पुढे म्हणाले. अश्विन वगळता माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीला संघाचे मार्गदर्शक म्हणून नियुक्त करण्यात आले आणि तो सपोर्ट स्टाफ व मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांच्या सोबत मिळून काम करेल. धोनीला संघाचा मेंटर बनवल्याबद्दल विचारले असता, गावस्कर म्हणाले की, स्पर्धेदरम्यान धोनीला संघाचे मेंटर बनवण्याचा फायदा भारताला मिळेल. “एमएस धोनी मार्गदर्शक असणे ही अश्विनच्या निवडीपेक्षा मोठी बातमी आहे कारण एक कर्णधार, ज्याने भारताला 2011 विश्वचषक आणि 2007 टी-20 वर्ल्ड कप जिंकून दिला, तो त्या शिबिरात असेल तर भारताला त्याचा खूप फायदा होईल,” ते पुढे म्हणाले.

दरम्यान, पुढील महिन्यात सुरू होणारी ही स्पर्धा मूलतः भारतात होणार होती, परंतु देशातील कोविड-19 परिस्थितीते आयोजकांना ती युएई आणि ओमानमध्ये हलवण्यात करण्यास भाग पाडले. भारत 24 ऑक्टोबर रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध दुबई येथे सुपर 12 च्या सामन्यात दुसऱ्या जेतेपदाच्या मोहिमेची सुरुवात करेल.