T20 World Cup 2021: पाकिस्तानविरुद्ध मॅचसाठी दिग्गज फलंदाजाने निवडली टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन, अश्विनच्या जागी ‘या’ गोलंदाजाला दिले स्थान
रविचंद्रन अश्विन (Photo Credit: Instagram)

24 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या टी-20 विश्वचषक (T20 World Cup) 2021 च्या सामन्यात भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) मैदानावर पुन्हा प्रतिस्पर्धा सुरु करतील. दोन्ही संघ आता फक्त आयसीसी स्पर्धा आणि आशिया कपमध्ये आमनेसामने येतात आणि 2 वर्षांनंतर दोन्ही संघात पुन्हा एकदा काट्याची टक्कर रंगणार आहे. बहुप्रतिक्षित स्पर्धेच्या एक महिन्यापूर्वी, भारताचे माजी सलामीवीर गौतम गंभीरने (Gautam Gambhir) भारत-पाकिस्तान सामन्याबद्दल आपले मत शेअर केले आणि त्याची टीम इंडिया (Team India) इलेव्हन निवडली. स्टार स्पोर्ट्सच्या शो फॉलो द ब्लूजमध्ये बोलताना गंभीरने काही स्वयंचलित निवड केली पण त्याने अश्विनला (Ashwin) प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. भारतीय निवडकर्त्यांनी युजवेंद्र चहलला वगळले तर त्यांनी 4 वर्षानंतर व्हाईट बॉल संघात आर अश्विनला परत बोलावले आहे. तरच दीपक चाहर आणि श्रेयस अय्यर यांना स्टँडबाय लिस्टमध्ये ठेवण्यात आले. शार्दुल ठाकूर टी-20 विश्वचषकासाठी निवडलेल्या राखीव खेळाडूंपैकी एक आहे. (T20 World Cup 2021: टी20 विश्वचषकासाठी MS Dhoni ला मार्गदर्शक म्हणून नियुक्त केल्यानंतर गौतम गंभीरने दिली प्रतिक्रिया, वाचा नक्की काय म्हणाला)

2007 टी-20 वर्ल्ड कप फायनलमध्ये 75 महत्त्वपूर्ण धावा करणाऱ्या गंभीरने रोहित शर्मा आणि केएल राहुल यांना दोन सलामीवीर म्हणून निवडले. त्यांच्यानंतर विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि रिषभ पंत फलंदाजीला उतरतील. तसेच संघात हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा हे दोन अष्टपैलू खेळाडू असतील. गंभीरने - भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह- अशा तीन आघाडीच्या वेगवान गोलंदाजांचा समावेश केला, तर त्याने वरूण चक्रवर्तीला एकमेव मुख्य फिरकीपटू म्हणून निवडले. चक्रवर्तीकडे गूढ घटक आहे आणि अंतिम प्लेइंग इलेव्हन त्याची निवड होते की नाही हे पाहणे बाकी आहे. विशेष म्हणजे तो अद्याप कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळलेला नाही. आयपीएलच्या साखळी टप्प्यातील खेळाडूंचा फॉर्म या स्पर्धेसाठी टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन ठरवण्यात मोठी भूमिका असण्याची शक्यता आहे.

गौतम गंभीरची पाकिस्तान विरोधात भारताची प्लेइंग इलेव्हन: विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह.