ऑस्ट्रेलिया संघाचे सर्व खेळाडू सध्या देशांतर्गत शेफील्ड शिल्ड (Sheffield Shield) मध्ये मल्टी-डे स्पर्धेत खेळत आहेत. कांगारू संघाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) देखील याच स्पर्धेतील न्यू साउथ वेल्स संघासाठी खेळत आहे. या स्पर्धेत स्टीव्हने प्रथम श्रेणी कारकीर्दीतील सर्वात हळू शतकाची नोंद केली आहे. शतक ठोकल्यानंतर लवकरच कधी न पाहिलेल्या पद्धतीने बाद झाला, जो आता चर्चेचा विषय ठरला आहे. न्यू साउथ वेल्स (New South Wales) कडून खेळताना स्मिथने वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्ध 295 चेंडूत 103 धावा केल्या. स्मिथने त्याच्या खेळीत 9 चौकार आणि 2 षटकार लगावले. मात्र या सामन्यात स्टीव्ह अत्यंत वादग्रस्त पद्धतीने बाद झाला. या मॅचदरम्यान स्मिथने 42 वे प्रथम श्रेणी शतक पूर्ण करण्यासाठी त्याने 295 चेंडूत खेळले. यापूर्वी त्याने इंग्लंडविरुद्ध 2017 मध्ये सर्वात हळू शतक ठोकले होते. त्यावेळी त्याने 261 बॉलचा सामना केला होता. (अफगाणिस्तानविरुद्ध 3rd ODI दरम्यान निकोलस पूरन याने केलं बॉल टेम्परिंग? वेस्ट इंडियन खेळाडूचे 'हे' वर्तन संशयाच्या भोवऱ्यात, पाहा Video)
स्टीव्हला मार्कस स्टोयनिस (Marcu Stoinis) याने एका वादग्रस्त पद्धतीने बाद केले. स्मिथने स्टोयनिसचा चेंडू विकेटकीपरच्या वरून मारण्याचा प्रयत्न केला परंतु तो अपयशी ठरला. दरम्यान, गोलंदाज आणि यष्टीरक्षकांनी झेलबादसाठी अपील केले आणि अंपायरने त्याला बाद केले. अंपायरच्या निर्णयाने स्मिथ आश्चर्यचकित झाला आणि काही क्षण विकेटवरच उभा राहिला. असे दिसले की चेंडूने स्मिथच्या बॅटला स्पर्श केला नव्हता म्हणून पंचांच्या निर्णयामुळे तो नाराज होता. स्टोयनिसच्या गोलंदाजीवर स्मिथने कट मारण्याचा प्रयत्न केला, पण यष्टीरक्षक जोश इंगलिस (Josh Inglis) याने तो चेंडू पकडला आणि अंपायरने त्याला बाद केले. पहा याचा व्हिडिओ:
NEVER tell Steve Smith he has to stop batting!
A bizarre dismissal brings the right-hander's 42nd first-class century to an end #SheffieldShield pic.twitter.com/KNEDpjtiFp
— cricket.com.au (@cricketcomau) November 12, 2019
स्मिथची ही खेळी त्याच्या नैसर्गिक खेळापेक्षा अगदी वेगळी होती. या डावात स्मिथने 295 चेंडू खेळले आणि त्याचा स्ट्राइक रेट अवघा 34 होता. स्मिथ त्याच्या आक्रमक खेळासाठी ओळखला जातो परंतु वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्ध तो खूप संयमित असल्याचे दिसून आले. या सामन्यातस्मिथने 105 चेंडूत पहिला चौकार ठोकला. एवढेच नव्हे तर खेळाच्या पहिल्या दिवशी त्याने 217 चेंडूतनाबाद 59 धावा केल्या होत्या.