ऑस्ट्रेलियाचे दिग्गज क्रिकेटपटू डेविड वॉर्नर आणि स्टिव्ह स्मिथ यांच्यावरील बंदी आता संपुष्टात आली आहे. आणि दोन्ही खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर दमदार पुनरागमन केले आहे. दक्षिण आफ्रिकाविरूद्ध टेस्ट सामन्यात चेंडूशी छेडछाड करण्याबाबत त्यांच्यावर एक वर्षाची बंदी घालण्यात आली होती. आणि आता अफगाणिस्तान (Afghanistan) विरुद्ध तिसर्या वनडे सामन्यात वेस्ट इंडिजचा (West Indies) निकोलस पूरन (Nicholas Pooran) चेंडूशी छेडछाड (Ball-Tampering) करताना आढळला आहे. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये सर्वांना प्रभावित करणारा पूरण सोमवारी लखनौमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध तिसऱ्या वनडे सामन्यात चेंडूसंदर्भात संशयास्पद वर्तन करताना पहिला गेला आहे. काल झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिजने 5 विकेटने विजय मिळवला आणि मालिका 3 सामन्यांच्या मालिकेत 3-0 ने क्लीन-स्वीप करत मालिका जिंकली.
अफगाणिस्तानविरुद्ध काल झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात अल्झारी जोसेफ 34 व्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी आला. व्हिडिओमध्ये पूरण त्याच्या पॅन्टला बॉल घासताना आणि नंतर नखाने कुरडताना दिसत आहे. याला बॉल टेम्परिंग म्हटले जाते. पूरणचे हे वर्तन कॅमेऱ्यात कैद झाले आणि याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओला लोकं संशयाने पहात आहेत. मात्र, अद्याप पूरणने चेंडूशी छेडछाड केली आहे की नाही याची खात्री झाली नाही. तक्रार केल्यास आणि दोषी आढळल्यास पूरणवर काही सामन्यांची बंदीची शिक्षा होऊ शकते. पहा या घटनेचा हा व्हिडिओ:
Hmm... 🤔#MeninMaroon #AFGvWI #AfgvsWI #WIvAFG @ACBofficials @windiescricket pic.twitter.com/my9MNjTkQI
— Paulami Chakraborty (@Polotwitts) November 11, 2019
मागील वर्षी ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरून बॅनक्रॉफ्ट यांच्या बॉल टॅम्परिंग घोटाळ्यामुळे क्रिकेटविश्व हादरला होता. त्यानंतर दोषी ठरल्यानंतर तिन्ही खेळाडूंविरुद्ध निलंबनाची कारवाई करण्यात अली होती. दरम्यान, या मॅचबद्दल बोलले तर तिसऱ्या सामन्यात विंडीजला 250 धावांचे लक्ष्य मिळाले होते, जे त्यांनी 48.4 ओव्हरमध्ये गाठले. शाई होप याने विंडीजच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. होपने नाबाद 109 धावा केल्या. विंडीजकडून पदार्पण करणाऱ्या ब्रँडन किंग याने 39 धावा केल्या. रोस्टन चेस याने नाबाद 42 आणि किरन पोलार्ड याने 32 धावांचे योगदान केले.