जगातील महान क्रिकेटपटूंपैकी ऑस्ट्रेलियाचा (Australia) माजी फिरकी गोलंदाज शेन वॉर्न (Shane Warne) याने आपल्या काळातील ऑस्ट्रेलियन कसोटी इलेव्हन (Australian Test XI) संघ निवडला आहे. वॉर्न हा ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या सुवर्ण काळाचा एक भाग होता आणि क्रिकेट विश्वातील महान फिरकी गोलंदाजांमध्ये त्याची गणना होते. या संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी त्याने माजी दिग्गज कर्णधार एलेन बॉर्डर (Allan Border) यांना दिली आहे. या संघात त्याने आपला माजी कर्णधार स्टीव्ह वॉ यांनाही जागा दिली आहे. याव्यतिरिक्त, वॉर्नने वॉचे खास पद्धतीने कौतुकही केले. वॉर्नने ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट इतिहासातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंमध्ये त्याच्या आवडीच्या दिग्गजांची निवड केली आहे. या संघात महान डेविड वॉर्नरचाही समावेश करण्याची त्याची इच्छा होती, परंतु वॉर्नरबरोबर वॉर्नला खेळण्याची संधी कधीच मिळाली नाही. वॉर्नने त्याच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये मार्क वॉ, रिकी पॉन्टिंग, अॅडम गिलक्रिस्ट आणि अनुभवी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्राला यांना स्थान दिले आहे. (COVID-19 लॉकडाऊनमुळे घरी बसलेला डेविड वॉर्नर झाला बोअर, भारतीय यूजर्स म्हणाले 'रामायण', 'महाभारत' बघ, पाहा Tweets)
दुसरीकडे, 90 च्या दशकाचे बरेच खास खेळाडू वॉर्नच्या 'बेस्ट प्लेइंग इलेव्हन'मध्ये स्थान मिळवू शकले नाहीत. यामध्ये डेविड बून, मार्क टेलर, डेमियन मार्टीन, इयान हेली, स्टुअर्ट मॅकगिल यांच्यासह वेगवान गोलंदाज ब्रेट ली, माइकल हसी, विश्वचषक विजेता कर्णधार माइकल क्लार्क आणि ऑस्ट्रेलियाचे विद्यमान प्रशिक्षक जस्टिन लँगर यांचा समावेश आहे. मधल्या फळीत फलंदाजी करण्यासाठी त्याने पॉन्टिंग, स्टीव्ह आणि मार्क वॉ आणि बॉर्डर यांची निवड केली. ऑस्ट्रेलियाकडून दुसर्या क्रमांकाचा सर्वाधिक कसोटी विकेट घेणाऱ्या वॉर्नने इन्स्टाग्राम अकाऊंटवरील चाहत्यांसह लाइव्ह सत्रादरम्यान आपला आवडता इलेव्हन उघडकीस केला. 12 वा सदस्य म्हणून मर्व ह्यूजेस यांना स्थान देण्यात आले.
शेन वॉर्नचा इलेव्हन: मॅथ्यू हेडन, माइकल स्लेटर, रिकी पॉन्टिंग, मार्क वॉ, एलन बॉर्डर (कॅप्टन), स्टीव वॉ, एडम गिलक्रिस्ट, टिम मे, जेसन गिलेस्पी, ग्लेन मॅकग्राथ, आणि ब्रूस रीड.