COVID-19 लॉकडाऊनमुळे घरी बसलेला डेविड वॉर्नर झाला बोअर, भारतीय यूजर्स म्हणाले 'रामायण', 'महाभारत' बघ, पाहा Tweets
डेविड वॉर्नर (Photo Credit: Getty Images)

जगातील बहुतेक देश कोविड-19 (COVID-19) साथीच्या आजाराशी झुंज देत आहेत. दरम्यान, जगातील बहुतेक देशांत लॉकडाऊन (Lockdown) जाहीर करण्यात आले आहेत. यामुळे, सर्व क्रीडा स्पर्धा रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्याने बरेच खेळाडू घरी बसून घरच्यांसोबत वेळ घालवत आहेत. ऑस्ट्रेलियाचा (Australia) सलामी फलंदाज डेविड वॉर्नरही (David Warner) घरी लॉकडाऊन झाला आहे आणि यामुळे तो आता बोअर झाला आहे. याबद्दल त्याने ट्विटरवर चाहत्यांकडून मदत मागितली ज्याच्यावर त्याला मजेदार उत्तरं मिळाली. वॉर्नरने ट्विटमध्ये लिहिले की, "घरी काय करावे, माझ्याकडे आता आयडीयाज संपत आहेत." कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) अनेक देशांमध्ये आंशिक किंवा पूर्ण लॉकडाऊन घोषित केले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की कोरोनाव्हायरस उर्फ कोविड-19 आतापर्यंत 634,000 पेक्षा जास्त प्रकरणे नोंदली गेली आहेत. (कोरोना व्हायरसमुळे कापला जाणार इंग्लंड क्रिकेटपटूंचा पगार; जो रूट, बेन स्टोक्ससह अन्य खेळाडूंच्या वेतनात होणार कोटींची कपात)

भारतातही लॉकडाऊन केल्याने प्रत्येकाला घरी बसावे लागत आहे, अशा स्थितीत काही जण बोअर होऊ लागले आहे. आणि वॉर्नरने केलेले हे ट्विट सर्वांचीच परिस्थिती बोलून दाखवत आहे. वॉर्नर भारतातील खूप लोकप्रिय क्रिकेटपटूंपैकी असलेला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहे. त्याने केलेल्या या ट्विटवर भारतीय चाहत्यांनी त्याला म्हटले की तो 'रामायण' आणि 'महाभारत' पाहू शकतो. टीव्ही शोचे नवीन भाग उपलब्ध नसल्याने दूरदर्शनवर बी. आर चोपडा यांच्या द्वारे निर्मित रामायण आणि महाभारतचं पुनःप्रक्षेपण केले जात आहे. पाहा वॉर्नरचे ट्विट:

वॉर्नरच्या ट्विटवर नेटकऱ्यांनी दिली अशी प्रतिक्रिया:

महाभारत आणि रामायण पहा!

तेलगू भाषा शिका

गोलंदाजीत सुधार कर

चला गप्पा सत्र करूया

आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार भारतात आतापर्यंत 1,024 रुग्णांची नोंद झाली असून 27 मृत्यू झाले आहेत. शिवाय 96 रुग्ण बरे झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 29 मार्च रोजी देशभरात 21 वर्षांच्या लॉकडाऊनमुळे होणाऱ्या अडचणींबद्दल माफी मागितली. लॉकडाऊनमुळे अनेक प्रवासी मजूर शहरांतून पळून मूळ गावी परतले.