Virat Kohli and Ravi Shastri | (Photo Credits: Twiteer/ANI)

ऑगस्ट 16, म्हणजे उद्या बीसीसीआय (BCCI) भारतीय संघाच्या (Indian Team) नव्या स्टाफचे आणि मुख्य प्रशिक्षकाच्या नावाची घोषणा करणार आहे. भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांच्या अध्यक्षतेखालील समितीने प्रशिक्षक पदासाठी सहा नावांची निवड केली आहे. मुख्य प्रशिक्षकासाठी रवी शास्त्री (Ravi Shastri) आणि गोलंदाजीसाठी भरत अरूण (Bharat Arun) यांचे नाव आघाडीवर आहे. शास्त्री अंतर्गत जुलै 2017 पासून झालेल्या 21 टेस्ट सामन्यांत भारताने 52.38 च्या विजय टक्केवारीसह 13 सामन्यात विजय मिळविला आहे. विश्वचषकनंतर भारतीय क्रिकेट बोर्डाने टीम इंडियाच्या नवीन स्टाफ आणि मुख्य प्रशिक्षक पदासाठी अर्ज मागवली होते. यात शास्त्री यांनी देखील प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला होता. रवी शास्त्रींसोबतच ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू टॉम मूडी, रॉबीन सिंह त्याचबरोबर माईक हेसन, फिल सिमन्स या नावांची निवड करण्यात आली आहे. पण, बॅंटिंग कोचसाठी एक नवीन नाव समोर आले आहे. (वीरेंद्र सेहवाग याने व्यक्त केली निवड समितीचा प्रमुख होण्याची इच्छा, Netizens ने ट्रोल करत BCCI ला धरले धारेवर)

टाईम्स ऑफ इंडियामधील वृत्तानुसार, भारतीय संघाचा माजी सलामीवीर विक्रम राठोड (Vikram Rathour) यांची बॅटिंग कोच म्हणून नियुक्ती केली जाऊ शकते. यंदा बॅटिंग कोचच्या पदासाठी इंग्लंडचा माजी फलंदाज जोनाथन ट्रॉट, मार्क रामप्रकाश, अमोल मुझूमदार, ऋषिकेश काणेटकर, प्रवीण आम्रे, लालचंद राजपूत, तिलन समरावीरा आणि विक्रम राठोड यांनी अर्ज केले आहेत. आणि राठोड यांचे नाव आघाडीवर आहे. राठोड, हे भारताचे सलामीचे फलंदाज होते. त्यांनी भारतासाठी 6 टेस्ट आणि 7 वनडे सामने खेळले आहेत. पंजाबकडून खेळात त्यांनी 50च्या सरासरीने धावा केल्या आहेत.

दरम्यान, या वर्षी विक्रम यांची भारत ए संघाच्या बॅटिंग प्रशिक्षक पदासाठी निवड झाली होती. यासाठी स्वतः राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी त्यांची शिफारस केली होती.