वीरेंद्र सेहवाग याने व्यक्त केली निवड समितीचा प्रमुख होण्याची इच्छा, Netizens ने ट्रोल करत BCCI ला धरले धारेवर
विरेंद्र सेहवाग संग्रहित छायाचित्र (Photo: @virendersehwag/Twitter)

भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) नेहमीच आपल्या ट्विटने चर्चेत राहिला आहे. सेहवाग, टीम इंडियाचा कोच होण्याच्या शर्यतीत असल्याचे वृत्त समोर आले होते. पण, सेहवागने आता कोच नाही तर निवडकर्ता बनण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सेहवागने एका ट्विटमध्ये आपली इच्छा व्यक्त केली. सेहवाग नेहमीच त्याच्या हटके ट्विटने सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनलेला असतो. आणि आता पुन्हा अशाच एका ट्विटने चर्चेत आला आहे. यावरून नेटिझन्सने त्याला मजेशीर प्रतिक्रिया दिल्या. (टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी रवि शास्त्रींसह या 5 दिग्गजांना केले शॉर्टलिस्ट, या दिवशी होणार Interview)

वीरू म्हणाला, 'मला सिलेक्टर व्हायचे आहे, पण मला कोण संधी देत नाही.' यावर चाहत्यांनी त्याला ट्रोल करत भारतीय क्रिकेट बोर्ड. बीसीसीआयवर निशाणा साधला आहे. काही यूजर्सने सेहवागला भारतीय क्रिकेटचा निवडकर्ता बनवण्यासाठी पाठिंबा दर्शविला तर काहींनी विद्यमान निवडकर्त्यांवर कठोरपणे विधान करत निवडकर्ता म्हणून अनावश्यक कामगिरी करणे चांगले नाही असे म्हटले आहे. सेहवागने विनोदाने ही इच्छा व्यक्त केली की तो याबद्दल गंभीर आहे हे मात्र अद्याप समजू शकले नाही, पण त्याच्या या ट्विटला नेटकऱ्यांकडून भन्नाट प्रतिक्रिया आल्या आहेत.

'आपली कामगिरी खूप चांगली आहे. निवडकर्ता बनण्यासाठी कमजोर प्रदर्शन करावे लागते'

तुम्ही एकतर निवडकर्ता होऊ शकणार नाही कारण तुम्ही एमएसके प्रसादपेक्षा कितीतरी पटीने चांगले आहात...

सर बीसीसीआय तुम्हाला हेतुसंबंध नोटीस बजावेल! राहू द्या.

सेहवागने 104 टेस्ट, 251 वनडे आणि 19 टी-20 सामन्यांत टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले आहे. सध्या सेहवाग आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भाष्यकार म्हणूनही दिसत आहे. सेहवागने यापूर्वीही भारतीय संघाचा प्रशिक्षक होण्याची इच्छा व्यक्त केली होती. याबद्दल त्याने कधीही ट्विट केले नव्हते, परंतु 2017 मध्ये विराट कोहलीशी झालेल्या वादानंतर प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी राजीनामा दिल्यावर सेहवागने नव्या प्रशिक्षकाच्या शर्यतीत असल्याचा दावा केला जात होता.