एमएस धोनी (Photo Credits: Getty Images)

शनिवारी भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी अत्यानंद दुःखद दिवस ठरला. माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) आणि सुरेश रैना यांनी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून निवृत्तीच्या बातमी जाहीर केली. भारताकडून अखेरचा एक खेळण्याचा आपला हेतूची घोषणा न करता धोनीने शांतपणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून एक्सिट केली. त्यासाठी काहींनी आवाज उठवला, मात्र आयपीएलचे (IPL) माजी अध्यक्ष राजीव शुक्ला (Rajeev Shukla) यांनी अशी कोणतीही योजना नसल्याचे स्पष्ट केले. भारताकडून धोनीने अखेरचा सामना न्यूझीलंडविरुद्ध 2019 वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये खेळला ज्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर तो केवळ भारताकडूनच नाही तर सर्व स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर राहिला. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी बीसीसीआयला किपर-फलंदाजासाठी फेअरवेल सामना आयोजित करण्याची विनंती केली. 39 वर्षीय धोनीने 90 टेस्ट, 350 वनडे आणि 98 टी-20 सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले. (महेंद्रसिंह धोनीची 7 नंबरची जर्सी कायमस्वरुपी रिटायर करावी; भारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिक याची बीसीसीआयकडे विनंती)

राजीव शुक्ला यांनी एएनआयला सांगितले की, धोनीने कधीही फेअरवेल मॅचबद्दल विचारणा केली नव्हती, त्यामुळे असा कोणताही सामना होणार नाही. “धोनीने बीसीसीआयकडे कधीही फेअरवेल सामन्याची इच्छा व्यक्त केली नाही. त्यांनी कधीही हा प्रश्न उपस्थित केला नसल्यामुळे अशा कोणत्याही सामन्याचा प्रश्नच उद्भवत नाही,” शुक्ला म्हणाले. झारखंडचे मुख्यमंत्री सोरेन यांनी बीसीसीआयला आवाहन केले आणि सांगितले की, आमच्या माहीचा फेअरवेल सामना रांची येथे झाला पाहिजे, ज्याचा संपूर्ण जग साक्षी असेल असे माझे मानणे आहे. मी बीसीसीआयला आवाहन करू इच्छित आहे की माहीचा फेअरवेल सामना आयोजित केला जावा, ज्याचे आयोजन संपूर्ण झारखंड करेल.

2007 50 ओव्हरच्या वर्ल्ड कपमध्ये भारताच्या खराब कामगिरीनंतर धोनीने मर्यादित षटकांच्या कर्णधारपदाची सूत्रे स्वीकारली या स्पर्धेत भारताला ग्रुप स्टेजमधून बाहेर पडावे लागले होते. त्यानंतर टीम इंडियाने 2007 टी-20 वर्ल्ड कप, 2011 वनडे वर्ल्ड कप आणि 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी विजेतेपद जिंकले. 2008 मध्ये, त्याने कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधारापद स्वीकारल्यानंतर 2009 मध्ये भारत कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहचले.