IND vs NZ 2020: पृथ्वी शॉ याने क्लिअर केला 'यो-यो' टेस्ट, न्यूझीलंडमध्ये भारत अ संघामध्ये समावेश होण्यासाठी सज्ज
पृथ्वी शॉ (Photo Credits: Getty Images)

टीम इंडियाचा युवा सलामी फलंदाज पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याने आपली फिटनेस टेस्ट पूर्ण केली असून तो लवकरच न्यूझीलंडमध्ये (New Zealand) भारत अ (India A) संघात सामील होण्यास सज्ज आहे. पृथ्वीला रणजी ट्रॉफी सामन्यादरम्यान खांद्याला दुखापत झाली होती, त्यानंतर त्याने बंगळुरु येथे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये 'यो-यो' टेस्ट क्लिअर केली आहे. नुबीकेसीच्या एमसीए मैदानावर कर्नाटकविरूद्ध मुंबईत झालेल्या रणजी करंडकातील सामन्यादरम्यान विजय मिळवताना शॉला अलीकडेच खांद्यावर दुखापत झाली होती ज्यानंतर न्यूझीलंडच्या भारत ए संघाच्या सराव दौर्‍यासाठी शॉच्या उपलब्धतेवर संभ्रम होता. "मंगळवारी सकाळी त्याने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) मध्ये अनिवार्य यो-यो चाचणी क्लिअर केली. न्यूझीलंडमध्ये भारत अ संघात सामील होण्यासाठी तो 16 किंवा 17 जानेवारीला प्रवास करेल, 'असे एका सूत्रांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले.  दरम्यान, पृथ्वी दोन सराव सामन्यांना मुकला असला तरी भारत आणि न्यूझीलंड अ यांच्यात 22 जानेवारी रोजी होणार्‍या पहिल्या वनडे सामन्यात शॉचा समावेश होईल. (IND vs NZ: हार्दिक पांड्या संघाबाहेर; विजय शंकर याला मिळाली संधी)

पहिल्या कसोटी सामन्यात रोहित शर्मा आणि मयंक अग्रवाल यांच्यानंतर तिसरा सलामी फलंदाज म्हणून 20 वर्षीय पृथ्वीचाही भारताच्या कसोटी संघात समावेश होऊ शकतो. दरम्यान, भारतीय निवड समितीने न्यूझीलंडविरुद्ध वनडे आणि कसोटी सामन्यांसाठी संघ निवड कायम ठेवले आहे. गेल्या वर्षी शस्त्रक्रिया करून पाठीच्या दुखापतीतून सावरत असलेल्या अष्टपैलू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्या फिटनेस टेस्टची प्रतीक्षा सध्या बोर्ड करत आहे. न्यूझीलंडविरुद्ध वनडे आणि टेस्ट मालिकेतला संघाची निवड ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिकेनंतर होणारी असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यावर 3 सामन्यांची वनडे मालिका खेळणार असेल. डोपिंग बंदीनंतर पृथ्वीने मैदानावर जबरदस्त पुनरागमन केले. या रणजी मोसमातील तीन सामन्यांमध्ये शॉने शानदार प्रदर्शन केले आहे. पृथ्वीने बडोद्याविरुद्ध 202 आणि 66 धावांचा जोरदार खेळ करत मुंबईला 309 धावांनी विजय मिळवून दिला. पृथ्वीने 2018 मध्ये वेस्टइंडिजविरुद्ध सामन्यात टेस्टमध्ये पदार्पण केले होते. त्याने एक शतक आणि एक अर्धशतकी डाव खेळला होता. दणदणीत डावानंतर शॉला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियामध्ये स्थान मिळालं पण सरावादरम्यान त्याला दुखापती झाल्याने बाहेर करण्यात आले. मात्र, जर तो आता तंदुरुस्त राहिला तर त्याला न्यूझीलंडविरुद्ध कसोटी संघात स्थान मिळू शकेल.