भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) फिटनेस टेस्टमध्ये (Fitness Test) अपयशी ठरल्याने त्याला संघाबाहेर जावे लागले आहे. हार्दिक पांडयाच्या जागेवर विजय शंकर (Vijay Shankar) याला संघात संधी देण्यात आली आहे. भारतीय संघाचा भारतीय संघ 24 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या दौऱ्यात 5 आंतरराष्ट्रीय टी20, तीन एकदिवसीय, दोन कसोटी सामने खेळले जाणार आहेत. पाठिच्या दुखापतीमुळे गेल्या चार महिन्यांपासून संघाबाहेर असलेल्या हार्दिक पांड्याला फिटनेस टेस्टमध्ये पास होता आले नाही. न्यूझीलंड दौऱ्यासाठी निवड समिती 15 खेळाडू निवडणार की 16 किंवा 17 ते पाहणे औत्सुक्याचे असेल.

बीसीसीआयच्या वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हार्दिक पांड्या फिटनेस टेस्टमध्ये अपयशी ठरल्याने त्याला संघातून बाहेर बसावे लागत आहे. फिटनेस टेस्टमध्ये त्याचा स्कोर आवश्यकते पेक्षा खूपच कमी होता. त्यातून तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी फिट नसल्याचे दिसते. अशा परिस्थितीत त्याला भारत ए टीमसोबत जाता येणार नाही. भारत ए टीमच्या फिटनेस टेस्ट मध्ये योयो टेस्ट केली जात नाही. निवड समितीने त्याला रणजी ट्रॉफी न खेळता भारत ए संघात स्थान दिले होते. हे देखील वाचा- T20 विश्वचषक 2020 स्पर्धेसाठी भारतीय महिला संघाची घोषणा; 15 वर्षीय शेफाली वर्माला संधी, पहा संपूर्ण यादी

भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या सामन्यांचे वेळापत्रक-

भारत आणि न्यूझीलंड टी-20 मालिका वेळापत्रक-

24 जानेवारी- पहिला टी-20 सामना (ईडन पार्क, ऑकलॅंड येथे दुपारी 12.30 वा.)

26 जानेवारी- दुसरा टी-20 सामना (ईडन पार्क, ऑकलॅंड येथे दुपारी 12.30 वा.)

29 जानेवारी- तीसरा टी-20 सामना (सेडन पार्क, हेमिल्टन येथे दुपारी 12.30 वा.)

31 जानेवारी- चौथा टी-20 सामना (वेस्टपॅक स्टेडियम, वेलिंग्टन येथे दुपारी 12.30 वा)

02 फेब्रुवारी- पाचवा टी-20 सामना (बे ओवल, माउंट मॉन्गनुईड येथे दुपारी 12.30 वा)

भारत आणि न्यूझीलंड एकदिवसीय मालिका वेळापत्रक-

05 फेब्रुवारी- पहला एकदिवसीय सामना (सेडन पार्क, हेमिल्टन येथे सकाळी 07.30 वा.)

08 फेब्रुवारी- दुसरा एकदिवसीय सामना (ईडन पार्क, ऑकलॅंड येथे सकाळी 07.30 वा.)

11 फेब्रुवारी- तीसरा एकदिवसीय सामना (बे ओवल, माउंट मॉन्गनुईड येथे 07.30 वा.)

भारत आणि न्यूझीलंड कसोटी मालिका वेळापत्रक-

14 फेब्रुवारी- कसोटी सामना (सेडन पार्क, हेमिल्टन येथे पहाटे 03.30 वा.)

21 फेब्रुवारी- कसोटी सामना (बासिन रिजर्व, वेलिंग्टन येथे पहाटे 04.00 वा.)

29 फेब्रुवारी- कसोटी सामना ( हेगले ओवल, क्राइस्टचर्च येथे पहाटे 04.00 वा.)

नुकतीच भारत आणि श्रीलंका यांच्यात टी-20 मालिका पार पडली होती. यात भारतीय संघाने चांगली कामगिरी बजावली होती. दरम्यान, भारतीय संघाने 2-0 असा विजय मिळवून मालिका आपल्या नावावर केली होती.