Pat Cummins Donations: कोरोनाविरुद्ध लढ्यात पॅट कमिन्सचे मोठे योगदान, भारताला इतक्या लाखांची केली मदत
पॅट कमिन्स (Photo Credit: PTI)

सध्या संपूर्ण भारत कोरोनाविरोधात (Coronavirus) लढा देत आहेत. ज्यामुळे देशावर आर्थिक संकट ओढावले आहे. दरम्यान, कोरोनाविरुद्ध लढ्यात अनेकजण आपपल्या परीने हातभार लावताना दिसत आहे. यातच ऑस्ट्रेलियाचा प्रमुख गोलंदाज पॅट कमिन्स (Pat Cummins) यानेही कोरोना विरुद्ध लढ्यात भारताला आर्थिक मदत केली आहे. त्याने कोरोनाविरुद्ध लढ्यात भारताला 50 हजार ऑस्ट्रेलियन डॉलर म्हणजे जवळपास 30 लाख रुपये पीएम केअर रिलीफ फंडला (PM Cares Relief Fund) दान करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या संकटकाळात अन्य खेळाडूंनीही भारताला मदतीचा हात द्यावा, असेही आवाहन त्याने केले आहे.

एक खेळाडू म्हणून माझीही काही जबाबदारी आहे. ज्यामुळे मी पीएम केअर फंडला निधी देण्याचे ठरवले आहे. विशेष म्हणजे, भारतातील रुग्णालयात ऑक्सिजनच्या खरेदीसाठी हा निधी असणार आहे. तसेच आयपीएलमधील माझ्या सहकाऱ्यांनाही मदत करण्याचे आवाहन करतो, असे पॅट कमिन्स इंस्टाग्रामवर केलेल्या पोस्टमध्ये लिहले आहे. हे देखील वाचा- IPL 2021: कोरोनाच्या भीतीने खेळाडू सोडत आहेत आयपीएल, BCCI ने सांगितले 'लीग सुरु राहणार'

एएनआयचे ट्वीट-

आयपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या कोलकाता नाईट राईडर्सचा वेगवान गोलंदाज पॅट कमिंसने मैदानाबाहेर देखील मोठी कामगिरी करून दाखवली आहे. त्याने कोरोनाविरुद्ध लढ्यात भारतासाठी जाहीर केलेल्या आर्थिक मदतीचे सर्वांनी कौतूक केले आहे. पॅट कमिंसच्या या निर्णयामुळे भारताला कोरोनाविरुद्धच्या लढाईत अधिक बळ मिळेल, असे बोलणे व्यर्थ ठरणार नाही.