भारतात कारोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. ही परिस्थिती पाहून IPL चे अनेक खेळाडू भीतीच्या सावटाखाली आहेत. दरम्यान भारताचे अनुभवी ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनसह ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी लीग मध्यावरच सोडून दिली आहे. असे असले तरीही बीसीसीआयने IPL सुरुच राहणार अशी माहिती दिली आहे. दिल्ली कॅपिटल्स चा अश्विनने सनराइजर्स हैदराबाद विरुद्ध सामना जिंकल्यानंतर "मी उद्यापासून आयपीएलच्या सत्रामधून ब्रेक घेत आहे. माझे कुटूंब कोरोना महामारीशी लढत आहे आणि अशा कठिण प्रसंगी त्यांना माझी गरज आहे" असे त्याने सांगितले आहे.
'जर परिस्थिती स्थिरस्थावर झाली तर पुन्हा येईल. धन्यवाद दिल्ली कॅपिटल्स' असेही तो पुढे म्हणाला. असे सांगण्यात येत आहे की, त्याच्या परिवारातील कुणाला तरी कोरोनाची लागण झाली आहे.
ऑस्ट्रेलिया आणि राजस्थान रॉयल्स गोलंदाज एंड्रयू टायेने भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढल्यानंतर आपल्या देशात प्रवेश घेता येणार नाही या भीतीने आयपीएल सोडले आहे. ऑस्ट्रेलियाचे अनेक क्रिकेटर हा निर्णय घेऊ शकतात. तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने केन रिचर्डसन आणि एडम जाम्पा ने सुद्धा काही खासगी कारणांसाठी IPL सोडले.
आयपीएल सामने 9 शहरांमध्ये दर्शकांशिवाय खेळले जात आहेत. टायने सांगितले की, त्यांच्या गृहनगर पर्थमध्ये भारतातून जाणा-या कोविड रुग्णांची संख्या वाढल्याने त्यांनी हा निर्णय घेतला. आपल्या देशात प्रवेश मिळणार नाही याआधीच आपण हा निर्णय घेतला आहे असे त्यांनी सांगितले. या सर्वांवर नजर टाकत बीसीसीआयने मात्र आयपीएल सुरुच राहणार. कुणाला आयपीएल सोडायचे असेल तर सोडू शकतो. असे सांगितले आहे.
दरम्यान RCB ने सांगितले की, 'एडम जाम्पा आणि केन रिचर्डसन खासगी कारणांसाठी स्वदेशी परतत आहे आणि उरलेले सामने खेळणार नाही. RCB त्यांच्या सोबत आहे आणि सर्वोतोपरी मदत करत आहेत.'
लेग स्पिनर जाम्पाला दिड कोटी आणि रिचर्डसनला 4 कोटी रुपयांत खरेदी करण्यात आले होते. याआधी रॉयल्सचे लियाम लिविंगस्टोन सुद्धा प्रवासात प्रतिबंध आल्याने ब्रिटेनमध्ये परतले आहेत.
इंग्लंड आणि बेल्स क्रिकेट बोर्डाचे प्रवक्त्यांनी सांगितले की, "आम्ही आपल्या खेळाळूंच्या सतत संपर्कात आहोत. आमच्या संवेदना भारतासोबत आहेत."
दरम्यान कोलकाता नाइट राइडर्सचे मेंटर डेविड हसी यांनी सांगितले आहे की, "ऑस्ट्रेलियन खिलाडी भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने चिंतेत आहे आणि म्हणून ते आपल्या मायदेशी जात आहेत."