Photo Credit - X

New Zealand National Cricket Team vs Pakistan National Cricket Team Match Scorecard: न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ, पाच सामन्यांच्या टीृ-20 मालिकेतील तिसरा सामना 21 मार्च (शुक्रवार) रोजी ऑकलंडमधील ईडन पार्क येथे खेळवण्यात आला. तिसऱ्या टी-20 सामन्यात पाकिस्तानने न्यूझीलंडचा 9 विकेट्सने पराभव केला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत पहिला विजय मिळवला. पाकिस्तानचा सलामीवीर हसन नवाजने 45 चेंडूत नाबाद 105 धावा करत संघाला 16 षटकांत 207 धावांचे लक्ष्य गाठून दिले. या विजयासह पाकिस्तानने मालिकेत पुनरागमन केले असले तरी, न्यूझीलंडने अजूनही 2-1 अशी आघाडी कायम ठेवली आहे. चौथा सामना 25 मार्च रोजी खेळला जाईल, जिथे पाकिस्तान मालिका बरोबरीत आणण्याचा प्रयत्न करेल.

प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंडची सुरुवात चांगली झाली नाही. तथापि, मार्क चॅपमन 94 धावांची ने शानदार खेळी केली आणि संघाला 204 धावांपर्यंत पोहोचवले. मायकेल ब्रेसवेलने काही जलद धावा केल्या पण पाकिस्तानच्या गोलंदाजांनी नियमित अंतराने विकेट घेत न्यूझीलंडला पूर्ण 20 षटके खेळू दिली नाहीत. पाकिस्तानकडून हरिस रौफ 3 विकेट घेत सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याच वेळी, अब्बास आफ्रिदीने 2 आणि शाहीन आफ्रिदी 2 विकेट घेवून महत्त्वाचे योगदान दिले.

हे देखील वाचा: New Zealand vs Pakistan 2nd T20I: पाकिस्तानची अवस्था वाईट; गेल्या 16 टी 20 सामन्यांमध्ये लगातार लाजिरवाणा पराभव

त्यानंतर 207 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाने आक्रमक फलंदाजी केली. सलामीवीर हसन नवाजने 45 चेंडूत 105 धावा केल्या, ज्यात 12 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. त्याच्यासोबत सलमान अली आगाने 51 धावाची महत्त्वपूर्ण खेळी केली आणि संघाला विजयाकडे नेले. मोहम्मद हरिस लवकर बाद झाला, तरी त्यामुळे पाकिस्तानची धावगती थांबली नाही. संघाने 16 व्या षटकातच लक्ष्य गाठले आणि न्यूझीलंडचा 9 विकेट्सने पराभव केला.