PC-X

New Zealand vs Pakistan 2nd T20I: पाकिस्तान क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. जिथे सध्या दोन्ही संघांमध्ये 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जात आहे. मालिकेतील दोन सामने खेळले गेले आहेत आणि दोन्ही सामन्यांमध्ये पाकिस्तानला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. गेल्या काही काळातील पाकिस्तानच्या कामगिरीकडे पाहता असे दिसते की हा संघ फक्त हरण्यासाठीच सामने खेळत आहे. पाकिस्तान संघ लहान संघांविरुद्ध सामने जिंकत असला तरी, मोठ्या संघांविरुद्ध त्याची कामगिरी खूपच खराब दिसून येते. गेल्या 16 टी-20 सामन्यांमध्ये पाकिस्तानी संघाची स्थिती खूपच वाईट असल्याचे पहायला मिळाले आहे.

2025च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधील पराभवानंतरही पाकिस्तान संघाच्या कामगिरीत सुधारणा होताना दिसत नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये पाकिस्तानी संघाला पराभवाचा सामना करावा लागला. फलंदाजीपासून गोलंदाजीपर्यंत पाकिस्तानी खेळाडू खराब कामगिरी करत आहेत. जर आपण पाकिस्तान संघाच्या शेवटच्या 16 टी-20 सामन्यांबद्दल बोललो तर संघाने फक्त 4 सामने जिंकले आहेत. पाकिस्तान संघाला जे काही विजय मिळाले आहेत ते झिम्बाब्वे, आयर्लंड आणि कॅनडा सारख्या कमकुवत संघांविरुद्धच मिळाले आहेत.

दुसऱ्या सामन्यात 5 विकेट्सनी पराभव

पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा सामना ड्युनेडिन येथे खेळला गेला. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघाला 15 षटकांत 9 गडी गमावून 135 धावा करता आल्या. फलंदाजी करताना, पाकिस्तान संघाकडून कर्णधार सलमान अली आघा यांने सर्वाधिक 46 धावा केल्या.

यानंतर, न्यूझीलंडने फलंदाजी करताना 13.1 षटकांत 5 गडी गमावून हे लक्ष्य गाठले. किवी संघाकडून फलंदाजी करताना टिम सेफर्टने 22 चेंडूत 45 धावांची खेळी केली. याशिवाय फिन अॅलनने 16 चेंडूत 38 धावा केल्या. पाकिस्तानकडून गोलंदाजी करताना, हरिस रौफने सर्वाधिक 2 विकेट्स घेतले.