Gully Cricket (Photo Credit: Twitter)

भारतात क्रिकेट खेळाला अधिक पसंती दर्शवली जाते. आपण अनेकदा पाहिले आहे की, क्रिकेट सामन्यात नेहमी चढ उतार होत असतात. पराभावाच्या उंबरठ्यावर असलेला संघ कधी बाजी मारेल, याचा काही नेम नाही. महत्वाचे म्हणजे, क्रिकेटमध्ये एका चेंडूवर 5 किंवा 6 धावांची गरज असताना षटकार मारणे गरजेचे असते. परंतु, गल्ली क्रिकेटमध्ये (Gully Cricket) एका चेंडूत 5 धावांची गरज असताना षटकार न लगावता फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. धक्कादायक म्हणजे, या सामन्यात शेवटचा चेंडू टाकणाऱ्या गोलंदाजाने नो-बॉल किंवा कोणताही अवैद्य चेंडू टाकलेला नाही. मात्र, तरीदेखील त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. अनेकांनी या व्हिडिओला पसंती दर्शवली आहे तर, काही लोकांनी पराभूत झालेल्या संघाची थट्टा केली आहे.

क्रिकेटमध्ये कधीही काही घडू शकते, असे नेहमी बोलले जाते. यातच सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. या व्हिडिओत एक खेळाडू गोलंदाजी करत आहे. एका चेंडूत 5 धावा असल्यामुळे सर्व खेळाडू बॉन्ड्री लाईनवर जाऊन उभे राहिले. परंतु, या सामन्यात फलंदाजी करणाऱ्या संघाने षटकार न लगावता सामना आपल्या नावावर केला आहे. दरम्यान, गोलंदाजाने चेंडू टाकल्यानंतर फलंदाजाने चेंडू सिमा बाहेर मारण्याचा प्रयत्न केला. परंतु, फलंदाजाने चुकीचा फटका मारल्याने चेंडू धावफळीवरच पडला. त्यावेळी क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूंमध्ये गोंधळ निर्माण झाला. दरम्यान, फलंदाजी करणाऱ्या संघाने याचा फायदा घेत 5 धावा पूर्ण करून विजय प्राप्त केला. हे देखील वाचा- युजवेंद्र चहल याने शेअर केला नवा टिक टॉक व्हिडीओ;रोहित शर्मा आणि खलिल अहमद सोबतची मस्ती पाहुन हसुन व्हाल हैराण

पाहा व्हिडिओ-

तसेच सारंग भालेराव ट्वीटर युजर्स खात्यावरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. शेवटच्या बॉलवर विजय मिळवण्यासाठी फलंदाजीच्या संघाला 5 धावांची आवश्यकता होती. आणि पुढे काय घडले यावर तुमचा विश्वास बसणार नाही, असे आशयाचे ट्विट सारंग भालेराव यांनी केले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. तसेच अनेक लोकांनी या व्हिडिओला पसंती दर्शवली आहे.