युजवेंद्र चहल याने शेअर केला नवा टिक टॉक व्हिडीओ;रोहित शर्मा आणि खलिल अहमद सोबतची मस्ती पाहुन हसुन व्हाल हैराण
Yuzvendra Chahal Tik Tok Vodeo (Photo Credits: Twitter)

टिक टॉक (Tik Tok) हा मोबाईल ऍप मार्केट मध्ये आल्यापासूनच सगळीकडे याची जोरदार चर्चा आहे. सामान्य माणसांपासून ते अगदी बड्या बड्या सेलिब्रिटींपर्यंत सर्वांच्याच तोंडावर केवळ टिक टॉकचे नाव आहे, कधी एखाद्या हिट गाण्यावर तर कधी एखाद्या गाजलेल्या डायलॉग वर मिमिक्री करणारे व्हिडीओ काढून या टिक टॉक स्टार्सनी नाव कमावले आहे. आता इतका प्रसिद्ध प्लॅटफॉर्म मग क्रिकेटर मंडळींना का त्याची भुरळ पडल्यावाचून राहील? क्रिकेटच्या मैदानावर सीरियस इनिंग्स खेळणारे टीम इंडिया (Team India) मधील अनेक मातब्बर खेळाडू सुद्धा या टिक टॉक वर अक्षरशः धुमाकूळ घालत असतात, यातीलच एक म्हणजे टीम इंडियाचा गोलंदाज युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal). मैदानात चहल ची जितकी चर्चा असते अगदी तितकीच चर्चा त्याच्या या टिकटॉक वर देखील पाहायला मिळत आहे. नुकताच त्याने आपले साथीदार रोहित शर्मा आणि खालिल अहमद यांच्यासोबतचा एक मजेशीर टिक टॉक व्हिडीओ शेअर केलाय.

चहलच्या या व्हिडिओमध्ये निवांत बसलेले रोहित शर्मा आणि खालिद अहमद पाहायला मिळत आहेत, क्रिकेट ग्राउंडवर असणाऱ्या ताणतणावापासून दूर आपल्या स्वतःच्या स्पेस मध्ये ही मंडळी एन्जॉय करताना या व्हिडीओ मध्ये दिसून येत आहेत. रोहित शर्मा ने युजवेंद्र चहल याला केले ट्रॉल, 'द रॉक' ड्वेन जॉन्सन याच्यासोबत शर्टलेस फोटो शेअर करत केली फिरकी गोलंदाजाची तुलना, पाहा Photo

पहा युझूवेंद्र चहल चा हा खास व्हिडीओ

दरम्यान, चहल हा सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे, किंबहुना यामुळेच अनेकदा त्याला ट्रोलिंगला देखील सामोरे जावे लागले आहे मात्र या सगळ्याकडे पाठ करून तो नेहमीच स्वतःच्या एलिमेंट मध्ये मनोसोक्त एन्जॉय करताना दिसून येतो.