रोहित शर्मा ने युजवेंद्र चहल याला केले ट्रॉल, 'द रॉक' ड्वेन जॉन्सन याच्यासोबत शर्टलेस फोटो शेअर करत केली फिरकी गोलंदाजाची तुलना, पाहा Photo
ड्वेन जॉन्सन आणि युझवेंद्र चहल (Photo Credit: Twitter)

ऑस्ट्रेलियाविरुध्द नुकत्याच झेलल्या थरारक मालिका विजयानंतर भारताचा फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) याने सोमवारी ट्विटरवर साथीदार युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याला ट्रोल केले. भारतीय संघात (Indian Team) मजेदार टिपण्णीन्नींसाठी नेहमीच चर्चेत असलेल्या फिरकी गोलंदाजाने माजी डब्लूडब्लूई स्टार आणि हॉलीवूड अभिनेता ड्वेन 'द रॉक' ड्वेन जाँनसन (Dwayne Johnson) सारखे छातीवर टॅटू काढले आहे. भारतीय सलामीवीर रोहित मैदानावर बर्‍यापैकी मस्त भूमिकेत असतो आणि सहकारी खेळाडूंबरोबर मजा करताना दिसत आहे. सोमवारी सोशल मीडियावर त्याने आपली अशीच शैली दाखविली आणि चहलसोबत मजेचा आनंद लुटला. भारतीय संघाने नुकताच ऑस्ट्रेलियाचा 2-1 असा पराभव करून वनडे मालिका जिंकली. या सामन्यात भारतीय संघाने अनेक विक्रमांची नोंद केली, मात्र या मालिकेनंतर रोहितने शेअर केलेल्या फोटोमुळे चहल चर्चेत आला आहे. (IND vs AUS 3rd ODI: रोहित शर्मा याने वनडेमध्ये केली कमाल; सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर यांना मागे टाकत 'ही' कामगिरी करणारा तिसरा वेगवान फलंदाज)

रोहितने युजवेंद्रबरोबर माजी डब्ल्यूडब्ल्यूई रेसलर 'द रॉक' च्या नावाने प्रसिद्ध जॉनसनचा फोटो शेअर केला. या फोटोला कॅप्शन देत रोहितने लिहिले, 'मी आज पाहिलेला सर्वोत्कृष्ट फोटो. भारताने मालिका जिंकली पण दुसरच कोणाची चर्चा होत आहे.' रोहितने या फोटोमध्ये चहललाही टॅग केले आहे.  रोहितने शेअर केलेल्या फोटोत एकीकडे चहल आणि दुसरीकडे 'द रॉक' आहे. दोघेही शर्टलेस होत त्यांच्या छातीवरील टॅटू फ्लॉन्ट करत आहे. दरम्यान, चहलनेही आपल्या ट्विटर अकाउंटवरून हा फोटो पुन्हा रिट्विट केला आहे. पाहा हा फोटो:

'द रॉक' रेसलर आहे आणि हॉलिवूड चित्रपटांमध्येही त्यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. 'द रॉक'ने त्याची शरीरवृष्टी चांगली राखली आहे. आणि त्यावर टॅटू मस्त दिसत आहेत. दुसरीकडे, चहल रॉकच्या तुलनेत बारीक आहे, मात्र काही काळापूर्वी सिंहाचा टॅटू काढला आहे. रोहितने चहलची 'द रॉक'शी तुलना करताना ट्रोल केले. दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिकेनंतर टीम इंडिया आता न्यूझीलंड दौऱ्यावर 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. रोहित आणि चहल दोघांनाही या मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आले आहे. पहिला टी-20 सामना 24 जानेवारी रोजी खेळला जाईल.