भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) मध्ये बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर मालिकेतील तिसरा वनडे सामना खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंच याने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहुल त्यांनी भारताकडून डावाची सुरुवात केली. मुंबईमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात रोहित काही खास खेळ करू शकला नाही आणि फक्त 10 धावांवर बाद झाला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात तो 42 धावांवर बाद झालं. आजच्या ऑस्ट्रेलिया तिसऱ्या सामन्यात रोहितने माजी दिग्गज फलंदाज सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा यांचा विक्रम मोडला. बेंगळुरूयामध्ये सुरु असलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात रोहितने 4 धावा करताच वनडे क्रिकेटमध्ये 9000 धावांचा टप्पा गाठला. शिवाय, ही कामगिरी करणारा तो तिसरा सर्वात जलद फलंदाज बनला. रोहितने 217 डावांमध्ये ही कामगिरी केली आणि तिसरे सर्वात जलद 9,000 धावांचा टप्पा गाठला. (IND vs AUS 3rd ODI: स्टिव्ह स्मिथ याचे झुंजार शतक, ऑस्ट्रेलियाचे टीम इंडियासमोर 287 धावांचे लक्ष्य)
या सामन्यापूर्वी रोहितने 216 डावात 8994 धावा केल्या होत्या. गांगुलीने 228, तेंडुलकरने 235 आणि लाराने 239 डावांत हा पराक्रम केला होता. वनडेमध्ये सर्वात वेगवान 9000 धावा करण्याचा विक्रम भारताचा कर्णधार विराट कोहली याच्या नावावर आहे. कोहलीने फक्त 194 डावात, तर दक्षिण आफ्रिकेचा एबी डी विलियर्स याने 205 डावांत या कामगिरीची नोंद केली आहे. 2019 मध्ये रोहितने शानदार खेळ केला होता. गेल्या वर्षी रोहितने वनडेमध्ये 7 शतकं, पैकी एकट्या विश्वचषकात विक्रमी 5 शतकं करण्यासाठी वनडे क्रिकेटपटूचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
बेंगळुरूमधील आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला 287 धावांचे लक्ष्य दिले. स्टिव्ह स्मिथने प्रभावी शतक करत संघाच्या मोठ्या धावसंख्येचा महत्वाचे योगदान दिले. तर, मोहम्मद शमीने टीम इंडियाकडून सर्वाधिक 4 गडी बाद केले. बेंगळुरूमधील सामन्यात रोहितने राहुलसह भारतीय डावाची सुरुवात केली आहे. शिखर धवनला फिल्डिंग करताना खांद्याला दुखापत झाल्याने फलंदाजांच्या क्रमवारीत बदल करण्यात आला आहे.