MS Dhoni Retirement: एमएस धोनीच्या निवृत्तीवर त्याच्या मॅनेजरने दिली मोठी अपडेट, पाहा काय म्हणाले
एमएस धोनी (Photo Credit: Getty)

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) याच्या निवृत्तीची सध्या फॅन्स आणि क्रिकेट समीक्षकांसाठी चर्चेचा विषय बनला. मागील वर्षी वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध परभावनांत धोनी एकही आंतराष्ट्रीय सामना खेळला नाही. अशा स्थितीत तो लवकरच क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करू शकतो असे म्हटले जात आहे. मात्र, धोनीने अद्याप यावर कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. 7 जुलै रोजी 40 शीत पदार्पण करणारा धोनी पुन्हा एकदा मैदानात परतणार असल्याची चर्चा रंगली आहे आणि त्याचा बालपणातील मित्र व मॅनेजर मिहीर दिवाकर (Mihir Diwakar) यांनी धोनी निवृत्तीबद्दल अजिबात विचार करत नाही याचीपुष्टी केली. धोनीने न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड कप 2019 उपांत्य सामन्यात अखेर भारताचे नेतृत्व केला आणि त्यानंतर त्याने क्रिकेटपासून विश्रांती घेतली आहे. तथापि, कोरोनामुळे स्थगित झालेल्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) पुनरागमन करण्यास तो तयार होता. (एमएस धोनीचा जाहिरातींना नकार, पर्यावरणपूरक सेंद्रिय खतांचा स्वत:चा ब्रँड बाजारात करणार लाँच)

धोनी आयपीएल खेळण्यासाठी खूप इच्छुक आहे आणि लॉकडाऊन दरम्यान तंदुरुस्ती कायम राखण्यासाठी कठोर प्रशिक्षण घेत आहे याची देखील मिहिर यांनी पुष्टी केली आहे. “तो आयपीएल खेळण्याचा विचार करत आहे. यासाठी त्याने खरोखर कष्ट केले आहेत. सर्व काही बंद होण्यापूर्वी तो एक महिना आधी चेन्नई येथे होता. त्याने आपल्या फार्महाऊसमध्ये तंदुरुस्तीची कायम ठेवली आहे आणि लॉकडाऊन उचलल्यानंतर तो सरावालाही सुरुवात करेल. परिस्थिती आता सामान्यतेत किती वेगवान आहे यावर आता सर्व काही अवलंबून आहे, ”असे त्यांनी Insidesportला सांगितले.

आयपीएल यंदा 29 मार्च पासून सुरु होणार होते, पण लॉकडाऊनमुळे ते 15 एप्रिल पर्यंत स्थगित करण्यात आले. त्यानंतर लॉकडाऊनचा कालावधी वाढल्याने अखेरीस स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली. दरम्यान, बीसीसीआय सध्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांत आईपीएलचे आयोजन करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि बुधवारी भारतीय क्रिकेट बोर्ड अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आगामी आशिया चषक रद्द झाल्याचे सांगितल्यावर आयपीएलच्या आयोजनाची शक्यता वाढली आहे. मात्र, आशिया चषकबाबत अद्याप आशियाई क्रिकेट परिषद किंवा पाक क्रिकेट बोर्डाकडून अद्याप अधिकृत स्पष्टीकरण मिळालेले नाही.