MS Dhoni Declines Brand Endorsement: एमएस धोनीचा जाहिरातींना नकार, पर्यावरणपूरक सेंद्रिय खतांचा स्वत:चा ब्रँड बाजारात करणार लाँच
भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने कोविड-19 च्या ठिकाणी काळात जाहिराती करण्यासाठी नकार दिला आणि रांचीच्या फार्महाउसमध्ये सध्या तो सेंद्रिय शेती करण्यामध्ये व्यस्त तो लवकरच स्वतःचा पर्यावरणपूरक खतांचा ब्रँड लवकरच बाजारात आणण्याच्या तयारीत असल्याची माहिती त्याचा मित्र व मॅनेजर मिहिर दिवाकर यांनी दिली.
भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने (Mahendra Singh Dhoni) कोविड-19 च्या ठिकाणी काळात जाहिराती करण्यासाठी नकार दिला आणि रांचीच्या (Ranchi) फार्महाउसमध्ये सध्या तो सेंद्रिय शेती (Organic Farming) करण्यामध्ये व्यस्त तो लवकरच स्वतःचा पर्यावरणपूरक खतांचा ब्रँड लवकरच बाजारात आणण्याच्या तयारीत असल्याची माहिती त्याचा मित्र व मॅनेजर मिहिर दिवाकर (Mihir Diwakar) यांनी दिली. गेल्या एक वर्षापासून क्रिकेटमधून विश्रांती घेतलेल्या विश्वचषक विजेत्या कर्णधाराने मंगळवारी 39 वा वाढदिवस साजरा केला. मॅनेजर आणि लहानपणीचे मित्र दिवाकर यांनी PTI शी बोलताना धोनीच्या रांची येथील घरी त्याच्या जीवनावर प्रकाश ठाकला. न्यूझीलंडविरुद्ध 2019 वर्ल्ड कप सेमीफायनल सामन्यानंतर धोनी एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. आयपीएलमध्ये धोनीची फटकेबाजी पाहण्यासाठी सर्वच उत्सुक होते, मात्र कोरोनामुळे स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली. (एमएस धोनी याचे 5 धाडसी निर्णय ज्यांनी प्रत्येकाला चकित केले पण बदलला भारतीय क्रिकेटचा चेहरा)
“देशभक्ती त्याच्या रक्तात आहे, ते देशासाठी (संरक्षणात) किंवा (शेतीसाठी) सेवा देणारा असो, तो त्याबद्दल खूप उत्कट असतो. त्याच्याकडे जवळपास 40-50 एकर शेती आहे आणि तो तेथे पपई, केळी यासारख्या सेंद्रिय पिकांच्या उत्पादनात व्यस्त आहे,” दिवाकर म्हणाले. आरका स्पोर्ट्सच्या नावाखाली एमएस धोनी क्रिकेट अकादमी चालवणारे दिवाकर पुढे म्हणाले की, “त्याने ब्रँड अॅन्डॉर्म्स बंद केले आहेत आणि म्हटले की आयुष्य सामान्य होईपर्यंत तो कोणतीही व्यावसायिक क्रियाकलाप करणार नाही."
आयपीएलमध्ये यष्टिरक्षक-फलंदाज धोनी पुन्हा क्रियाशील पुनरागमन करण्याची अपेक्षा होती पण कोरोना व्हायरसमुळे ते अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे. लॉकडाऊन दरम्यान तो नुकताच ट्रॅक्टर चालवताना दिसला. दिवाकर म्हणाले की तो लवकरच त्यांच्या कंपनीच्या निओ ग्लोबल या नावाने सेंद्रिय खत बाजारात आणणार आहेत. तो म्हणाला धोनीच्या शेतात खताची चाचणी घेण्यात येत आहे. दिवाकर म्हणाले, “आमच्याकडे तज्ञ आणि शास्त्रज्ञांची एक टीम आहे आणि त्यांनी खत विकसित केले आहे जे ते दोन-तीन महिन्यांत लाँच करणार आहे.”
(The above story first appeared on LatestLY on Jul 08, 2020 12:17 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

