भारतीय क्रिकेट टीमचा (Indian Cricket Team) माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) कट्टर आणि स्मार्ट क्रिकेटर मानला जातो. तो अनेकदा पैज खेळण्यासारखे मोठे निर्णय घेतो. आपल्या अचानक आणि अनोख्या निर्णयामुळे सर्वांनाच नवल कसे वाटले असे त्याने बर्याच वेळेवर सिद्ध केले आहे, परंतु मोठ्या प्रसंगी त्याने त्या निर्णयांनी भारतीय टीमला (Indian Team) विजय देखील मिळवून दिले आहेत. भारतीय क्रिकेटचा असा कर्णधार आज आपला 39 वा वाढदिवस साजरा करत आहे. न्यूझीलंडविरुद्ध 2019 वर्ल्ड कप सेमीफायनल सामन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून गायब असलेला धोनी यंदा आयपीएलमधून मैदानावर पुनरागमन करणार होता, पण कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे ते लांबणीवर गेले. धोनीसारखा खेळाडू आजपर्यंत भारताने पाहिला नव्हता आणि यापुढे कदाचित दिसणारही नाही. मैदानावरील त्याच्या निर्णयाने मैदानावर प्रतिस्पर्धी आणि मैदानाबाहेर चाहते चाहतेही चकित व्हायचे. धोनीला टक्कर देणारा अद्याप एकही खेळाडू दिसत नाही. (MS Dhoni Birthday Special: भारतीय क्रिकेट संघात प्रवेश करण्याअगोदर कसा दिसायचा महेंद्र सिंह धोनी? पाहा फोटो)
सर्व आयसीसी स्पर्धा जिंकणारा धोनी हा जगातील एकमेव कर्णधार आहे. टी-20 वर्ल्ड कप, वनडे विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी विजेतेपदाचा यात समावेश आहे. आज आपण या लेखात धोनीने घेतलेले 5 मुख्य निर्णय पाहणार आहोत ज्यांनी सर्वांना चकित केले मात्र, ज्यांनी भारतीय क्रिकेटचा चेहरा बदलून टाकला.
2007 टी -20 वर्ल्ड कप फायनल
पहिल्या टी-20 वर्ल्ड कप फायनलमध्ये हरभजन सिंहची एक ओव्हर शिल्लक असताना धोनीच्या त्याच्या जागी जोगिंदर शर्माला चेंडू दिला. त्यावेळी पाकिस्तानचा कर्णधार मिसबाह-उल-हक 35 चेंडूत 37 धावा करत होता आणि पाकिस्तानला विजयासाठी 13 धावांची गरज होती, पण धोनीने धोका पत्करला. जोगिंदरने वाइड बॉलपासून सुरुवात केली. मिसबाहने पॅडल शॉट मारला आणि श्रीशांतने त्याला झेलबाद केले. भारताने पाच धावांनी सामना जिंकला आणि टी-20 चा पहिला विश्वविजेता बनला. अनुभवहीन शर्मावर विश्वास ठेवण्याचा धोनीचा निर्णय मास्टरस्ट्रोक ठरला.
गांगुली-द्रविडला वनडे सामन्यातून बाहेर बसवले
ऑस्ट्रेलिया-श्रीलंका सोबत 2008 त्रिकोणीय वनडे मालिकेत धोनीने सौरव गांगुली आणि राहुल द्रविडसारख्या रिष्ठ खेळाडूंना वगळले. गांगुली-द्रविडच्या जोडीने वनडे सामन्यात सुमारे 23,000 धावा केल्या होत्या, अशा परिस्थितीत धोनीने या यशस्वी आणि वरिष्ठ जोडीला वनडेमधून वगळण्याच्या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्य वाटले. जेव्हा बीसीसीआयचे सचिव निरंजन शहा यांना यामागचे कारण विचारले गेले तेव्हा त्यांचे उत्तर असे होते की आमचा भर फिल्डिंगवर आहे. म्हणूनच आम्हाला युवा खेळाडू हवे होते. अशा प्रकारे ऑस्ट्रेलियातली पहिली तिरंगी मालिका भारताने जिंकली.
2011 विश्वचषकात स्वत:ला पाचव्या क्रमांकावर पदोन्नती दिली
2011 वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताला विजयासाठी 275 धावांची गरज होती. वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली आऊट झाले होते. विजयासाठी 161 धावांची अधिक गरज होती, आणि वानखेडे स्टेडियमवर धोनी पाचव्या स्थानावर फलंदाजीस आला. धोनीने नाबाद 91 धावांचा डाव खेळला आणि भारताला दुसऱ्यांदा विश्वविजेताचा मान मिळवून दिला. धोनीऐवजी गौतम गंभीरने 97 धावांचा डाव खेळला.
रोहित शर्माकडून डावाची सुरुवात करण्याचा निर्णय
2013 हा धोनीसाठी खास होता. त्याने वनडे विश्वचषक, टी-20 वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. हेच ते वर्ष होते जेव्हा त्याने उपस्थित खेळाडूंच्या संघात एक ठाम स्थान स्थापित करण्यासाठी काही प्रयोग केले आणि रोहितला याचा चांगला फायदा झाला. 2011 दक्षिण आफ्रिका दौर्यादरम्यान रोहितला सलामीची संधी देणारा धोनी पहिला कर्णधार होता. रोहितने तीन डावांमध्ये केवळ 29 धावा केल्या. असे असूनही धोनीने 2013 मध्ये पुन्हा एकदा रोहितला डावाची सुरुवात करण्याची संधी दिली आणि यावेळी रोहितने 83 धावांचा डाव खेळला. यानंतर, त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही आणि मधल्या फळीतून पुढे सरकून तो जगातील सर्वात स्फोटक फलंदाज ठरला.
सीबी मालिका 2012-13 मध्ये तेंडुलकर / सेहवाग / गंभीरला रोटेट केले
क्रिकेट हा भारतातील एक धर्म मानला जातो आणि येथे खेळाडूंची पूजा केली जाते. अशा परिस्थितीत धोनीने येऊन ही संस्कृती बदलली. 2008 मध्ये त्याने चांगल्या फिल्डर्ससाठी खेळाडूंना फिरवण्यास सुरवात केली. सीबी सीरिज 2012 मध्ये धोनीने सचिन तेंडुलकर, गौतम गंभीर आणि वीरेंद्र सेहवाग यांना सतत फिरवले. उत्तम विक्रम असूनही हे तिन्ही खेळाडू एकत्रितपणे संघात खेळू शकले नाहीत. धोनी त्यांना फिरवत राहिला.
धोनीच्या या निर्णयांनी जाणकार आणि चाहत्यांना चकितच केले नाही, तर विश्व क्रिकेटला नवीन चेहरेही मिळवून दिले. विशेषतः रोहितला डावाची सुरुवात करण्याचा निर्णय 'हिटमॅन'साठी महत्वाचा ठरला आणि आज त्याने वनडे क्रिकेटमध्ये एक नाही तर तब्बल तीन दुहेरी शतकं ठोकली. आज धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून दूर असला तरी त्याचे निर्णय योग्य असल्याचे आज आपल्यास पाहायला मिळत आहे.