भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह (Mahendra Singh Dhoni) धोनी उद्या 7 जुलै रोजी त्याचा 39वा वाढदिवस साजरा करणार आहे. महेंद्र सिंह धोनी याचा जन्म 7 जुलै 1981 साली झाला होता. महेंद्र सिंह धोनीने आपल्या कारकिर्दितील पहिला सामना 2004 मध्ये बांग्लादेशाविरोधात खेळला होता. महेंद्र सिंह धोनीने आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर संपूर्ण देशाचे मन जिंकले आहे. आज लाखो- कोटी रुपायांच्या किंमतीच्या गाड्यात फिरणारा महेंद्र सिंह धोनी याचे लहानपण अगदी साधारण होते. भारतीय क्रिकेट संघात प्रेवश करण्याअगोदर महेंद्र सिंह धोनीचा अनेक अडचणींना सामोरे जावा लागले होते. हे सर्वांनाच माहिती आहे. सध्या महेंद्र सिंह धोनी याच्या वाढदिवसानिमित्ताने सोशल मीडियावर त्याचे जुने फोटो व्हायरल होऊ लागले आहेत. त्यापैकी काही फोटो खालील देण्यात आले आहेत.
महेंद्र सिंह धोनीचे वडील पान सिंह यांची नोकरी साधारण होती. त्यावेळी धोनीला एक क्रिकेट किट खरेदी करणे कठीण जात होते. धोनीने आर्थिक परिस्थितीकडे पाहून रेल्वेत तिकीट कलेक्टरची नोकरी केली होती. मात्र, आज महेंद्र सिंह धोनी हा अनेक खेळाडूंसाठी मोठा आदर्श ठरला आहे. त्याने उत्तम कामगिरीच्या जोरावर क्रिकेट विश्वात स्वत:ची अनोखी ओळख निर्माण केली आहे. जगातील सर्वोकृष्ट कर्णधारांमध्ये महेंद्र सिंह धोनीचे नाव घेतले जात आहे. तसेच त्याच्या कर्णधारपदाचे कौतूकही केले जात आहे. महेंद्र सिंह धोनीने आपल्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने एकदिवसीय विश्वचषक, टी-20 विश्वचषक आणि आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी जिंकली आहे. या तिन्ही ट्रॉफी जिंकणार तो एकमेक कर्णधार ठरला आहे. हे देखील वाचा- MS Dhoni Images & HD Wallpapers For Free Download: एमएस धोनी याच्या वाढदिवसानिमित्ताने शेअर करा शुभेच्छा, ग्रीटिंग्ज, टीम इंडिया आणि भारतीय सेनेच्या युनिफॉर्म मधील फोटो
महेंद्र सिंह धोनीचा फोटो-
महेंद्र सिंह धोनीचा फोटो-
महेंद्र सिंह धोनीचा फोटो-
महेंद्र सिंह धोनीचा फोटो-
महेंद्र सिंह धोनीने आतापर्यंत 350 एकदिवसीय आणि 90 कसोटी तर, 98 टी-20 सामने खेळले आहेत. महेंद्र सिंह धोनीने एकदिवसीय सामन्यात 50.6 च्या सरासरीने 10 हजार 773 धावा केल्या आहेत. त्याने कसोटी क्रिकेटमधून सन्यास घेतला आहे. कसोटी सामन्यात त्याने 38.1 च्या सरासरीने 4 हजार 876 धावा केल्या आहेत. तर, टी-20 सामन्यात 37.6 च्या सरासरीने 1 हजार 617 धावा केल्या आहेत.