टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि दोन वर्ल्ड कप विजेता महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) मंगळवारी, 7 जुलै रोजी आपला 39 वा वाढदिवस साजरा करणार आहे. धोनीच्या वाढदिवसाच्या काही दिवसांपूर्वी चाहत्यांमध्ये या खास दिवसाची उत्सुकता पाहायला मिळत आहे. 7 जुलै, 1981 रोजी जन्मलेला एमएस धोनी (MS Dhoni), क्रिकेट विश्वातील एक प्रचलित नाव आहे आणि सर्वकालिक महान क्रिकेटपटूंपैकी एक आहे. 2004 मध्ये भारताकडून (India) पदार्पण करणाऱ्या धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने पहिले 2007 टी-20, 2011 मध्ये वनडे वर्ल्ड कप आणि 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचा पराक्रम केला. दोन विश्वचषक स्पर्धा जिंकणारा धोनी सध्या एकमेव कर्णधार आहे. इतकंच नाही तर इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (Indian Premier League) देखील धोनीला टक्का देणारा एकही कर्णधार नाही. आयपीएलमध्ये धोनी आजवर कर्णधार म्हणून सर्वाधिक विजय नोंदवले आहे. त्याचे कट्टर चाहते बेडरूममध्ये त्यांची आवडत्या आयडलचे पोस्टर्स, डेस्कटॉप/लॅपटॉपवर वॉलपेपर, मोबाइल स्क्रीन सेव्हर आणि असेच काही फोटो लावून आपलं प्रेम व्यक्त करतात. (जेव्हा पापा एमएस धोनी याने बेशुद्ध पक्ष्याला दिले जीवदान, लेक जीवाने सांगितली कहाणी)
तर, एमएस धोनीच्या 39 व्या वाढदिवसाच्या आधी आम्ही आपल्यासाठी त्याच्या फोटोंचा संग्रह, एचडी वॉलपेपर, वाढदिवसाच्या शुभेच्छा, भारतीय संघातील आणि आयपीएल टीम सीएसके जर्सीतील धोनीचे फोटो आणि बरेच काही फ्री डाउनलोडसाठी घेऊन आलो आहोत. आपल्यापैकी बरेचजण एक खेळाडूला आयडल मानून मोठे झालो आहोत. खेळाचा एक प्रकारचा प्रभाव आहे. आणि धोनी खेळाचा सर्वोत्तम एम्बेसडर आहे. धोनी लाखो आणि कोट्यावधी चाहत्यांसाठी रोल मॉडेल आहे, मग ती लहान मुले असो किंवा युवा. धोनीच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा आणि मेसेजसह HD फोटो येथे पाहा:
एमएस धोनी 2019 टीम इंडिया जर्सीमध्ये
टीम इंडियाच्या ऑरेंज जर्सीमध्ये एमएस धोनी
आयपीएलच्या चेन्नई सुपर किंग्ज जर्सी मधील एमएस धोनी एचडी फोटो
भारतीय सैन्य गणवेशात एमएस धोनी एचडी वॉलपेपर
वनडे वर्ल्ड कप ट्रॉफी सोबत एमएस धोनी वॉलपेपर
पाकिस्तान विरुद्ध टी-20 वर्ल्ड कप विजय
महेंद्र सिंह धोनीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
- वाढदिवसाच्या शुभेच्छा लिजेंड! आपले आयुष्य प्रेमाने परिपूर्ण होऊ द्या, स्वप्ने सत्यात येतील आणि सुख समृद्ध होऊ दे,वाढदिवसाच्या शुभेच्छा एमएस धोनी!
- आपण खरोखरच स्पोर्ट्स वर्ल्डमध्ये खूप मोठे आहात. भारतीय क्रिकेटला आजच्या स्थानापर्यंत पोहोचवल्याबद्दल धन्यवाद! भविष्यातील सर्व प्रयत्नांसाठी तुम्हाला शुभेच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, थाला धोनी!
- तुमच्या वाढदिवशी, मी तुमच्या आयुष्यासाठी आणि तुम्हाला इतकी प्रतिभा देण्यासाठी मी देवाचे आभार मानतो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
- आपण आपल्या कार्याद्वारे आपल्या आयुष्यात बरेच काही साध्य केले आहे. प्रत्येक गेमसह आपण किती मोठा वारसा तयार केला आहे!
आम्हाला आशा आहे की धोनीचे सर्व चाहते त्यांच्या आवडत्या खेळाडूचे सर्व सुंदर फोटो आणि वॉलपेपर पाहून आनंदित होतील. त्यामुळे, आमच्या वेबसाईटला भेट द्या आणि धोनीचे फोटो व वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करून फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामवर ऑनलाईन शेअर करा आणि त्यांना व्हॉट्सअॅप स्टेटस, स्टोर म्हणूनही तुम्ही सेट करू शकता.