भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) सध्या रांचीमधील (Ranchi) कुटुंबासमवेत दर्जेदार वेळ घालवत आहे. कोविड-19 लॉकडाऊन दरम्यान धोनीची पत्नी साक्षीने सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर केले ज्यात धोनी आपली पत्नी आणि मुलगी जीवाबरोबर (Ziva) वेळ घालवत आहे. मंगळवारी जीवाने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली ज्यामध्ये पापा धोनीने बेशुद्ध पक्ष्याचा जीव कसा वाचवला ते तिने सांगितले. जीवाच्या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, एक पक्षी (Coppersmith) त्यांच्या घरी आला होता, ती बेशुद्ध पडली होती आणि त्याला धोनीने पाणी दिलं आणि तिची देखभाल केली. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये धोनीने पक्ष्याला हातात धरले आहे. धोनीची त्याच्या शांत स्वभावाबद्दल केवळ भारतातच नव्हे तर जगभरात त्याची प्रशंसा केली जाते. आणि बेशुद्ध पक्षाचा जीव वाचवण्यासाठी धोनीच्या या शांत स्वभावाने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधले. (एमएस धोनीची ‘अशी’ झाली होती टीम इंडियासाठी निवड, भारताच्या पहिल्या वर्ल्ड कप विजेत्या विकेटकीपर आणि निवड समिती सदस्याने सांगितला अनटोल्ड किस्सा)
जीवाच्या अकाऊंटवरील कॅप्शनवर लिहिले की, 'मी आज संध्याकाळी लॉनमध्ये एक पक्षी पाहिला, तो बेशुद्ध पडला होता. मी माझ्या पालकांना आवाज दिला. बाबांनी पक्ष्याला हातात घेतले आणि पाणी पाजले, थोड्या वेळाने पक्ष्याने आपले डोळे उघडले. आम्ही सर्व खूप आनंदी होतो. आम्ही काही पाने टोपलीमध्ये ठेवली आणि पक्षीला त्यात ठेवले. मम्मी म्हणाली की ही क्रिमसन-ब्रिस्टेड बार्बेट आहे, ज्याला कॉपरस्मिथ देखील म्हणतात. खूप गोंडस पक्षी होता. मग अचानक ती उडून गेली, मला तिला ठेवायचे होते, परंतु आईने सांगितले की ती आपल्या आईकडे गेली आहे. मला खात्री आहे की मी तिला पुन्हा भेटेन."
गेल्या 11 महिन्यांपासून धोनी क्रिकेटपासून दूर आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड कप स्पर्धेत त्याने अखेरचा स्पर्धात्मक सामना खेळला होता. दरम्यान, त्याच्या क्रिकेटमधील भविष्याबद्दल चर्चा सुरू असतानाही वर्ल्ड कप विजेत्या माजी कर्णधाराने आपल्या योजनांबद्दल मौन धारण केले आहे.