Mushtaq Khan Dies: ज्येष्ठ अभिनेते मुश्ताक खान यांचे वयाच्या 75 व्या वर्षी निधन; फुफ्फुसाच्या कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी
हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ आणि हरहुन्नरी अभिनेते मुश्ताक खान यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले. ते गेल्या काही काळापासून फुफ्फुसाच्या कर्करोगाशी (Lung Cancer) झुंज देत होते. तब्येत खालावल्यामुळे त्यांना १५ दिवसांपूर्वी मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
पाच वर्षांपूर्वी त्यांना कर्करोगाचे निदान झाले होते. योग्य उपचारांनंतर त्यांनी या आजारावर मात केली होती; मात्र अलीकडेच त्यांना कर्करोगाचा पुन्हा त्रास सुरू झाला.
"Actor Mushtaq Khan died today," Federation of Western India Cine Employees (FWICE) president BN Tiwari confirms to ANI over phone
(File photo of Mushtaq Khan) https://t.co/9gLDbKS2oA
— ANI (@ANI) September 24, 2026
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 24, 2026 09:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

