माइकल होल्डिंग (Photo Credit: Getty)

वेस्ट इंडीजचे माजी वेगवान गोलंदाज माइकल होल्डिंग (Michael Holding) यांनी आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (World Test Championship) पॉईंट सिस्टमवर टीका केली आणि म्हटले की फॉरमॅट पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचण्यापूर्वी त्याबद्दल विचार करणे आवश्यक आहे. आयसीसीने ऑगस्ट 2019 मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची सुरुवात केली ज्यात रँकिंगमधील पहिले 9 टीम सहभाग घेतील. या चॅम्पियनशिपचा फायनल जून 2021 मध्ये लॉर्ड्स मैदानावर खेळला जाईल. गुणतालिकेतील पहिल्या दोन टीममध्ये फायनलचा सामना रंगेल. चॅम्पियनशिपनुसार प्रत्येक मालिकेत 120 गुण असतात आणि मालिकांमधील सामन्यांनुसार गुण विभागले जातात. उदाहरणार्थ, जर मालिकेत पाच सामने असतील तर प्रत्येक सामन्यात 24 गुण आहेत. विस्डेनने होल्डिंगचे म्हणणे उद्धृत केले की, "ते कार्य करणार नाही. सर्व प्रथम, संख्या प्रणाली हास्यास्पद आहे. दोन कसोटी सामने खेळून जितके गुण आपण मिळवू शकता तितकेच पाच कसोटी सामने खेळून मिळवता येतात." (ICC Rankings: ऑस्ट्रेलियाचा टीम इंडिया, पाकिस्तानला दे धक्का; आयसीसी टेस्ट आणि टी-20 रँकिंगमध्ये मिळवले अव्वल स्थान)

"दुसरे म्हणजे अशी वेळ येईल जेव्हा एखाद्या संघास पूर्वी माहित असेल की ते अंतिम फेरी गाठू शकते, त्यामुळे त्यांचे कसोटी सामने मजेदार होणार नाहीत." भारतीय संघाने चॅम्पियनशिपमध्ये आतापर्यंत सर्वाधिक नऊ सामने खेळले असून त्यापैकी सात सामने जिंकले. सध्या ते 360 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. यापूर्वीही बऱ्याच खेळाडूंनी याबाबत चिंता व्यक्त केली होती. कोरोना व्हायरसमुळे सध्या क्रिकेटसह अन्य खेळ ठप्प झाले आहे. या अगोदर भारताने न्यूझीलंड दौऱ्यावर दोन सामन्यांची टेस्ट मालिका खेळली ज्यात त्यांना क्लीन स्वीपला सामोरे जावे लागले होते.

या चर्चेचा भाग असलेले इंग्लंडचा वेगवान गोलंदाज क्रिस वोक्स म्हणाला की, भविष्यात पॉईंट्स सिस्टीममध्ये बदल करावा लागू शकतो. वोक्स म्हणाला की, "न्यूझीलंड मालिका (इंग्लंडचा 0-1 असा पराभव झाला) वर्ल्ड टेस्ट चँपियनशिपचा भाग नव्हती परंतु या पराभवाचा आमच्यावर खेळाडू म्हणून कमी परिणाम झाला नाही." तो म्हणाला, "मला वाटते की भविष्यात या व्यवस्थेत थोडा बदल करण्याची गरज आहे. एकमेव अंतिम सामन्यात कोणताही संघ नाणेफेक आणि परिस्थितीनुसार कोणालाही हरवू शकतो. जर कॅलेंडरमध्ये अधिक वेळ उपलब्ध असेल तर तीन सामन्यांचा फायनल असू शकतात परंतु दुर्दैवाने तसे झाले नाही."