कोरोना व्हायरसमुळे सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट ठप्प पडले आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने (ICC) नुकत्याच जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाने टीमने भारत (India) आणि पाकिस्तानचे (Pakistan) अनुक्रमे टेस्ट आणि टी-20 रँकिंगमधील राज्य संपुष्टात आणले आहे. भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाकडून (Australia) टेस्ट रँकिंगमधील पहिले स्थान गमावले आहे. गेल्या काही वर्षांत भारतीय संघाने कसोटी क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली आणि ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदाच त्यांच्याच भूमीवर कसोटी मालिकेत पराभूत केले शिवाय, टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध कसोटी मालिकादेखील जिंकली. वार्षिक अद्ययावत भाग म्हणून आयसीसीने शुक्रवारी 1 मे रोजी नवीन क्रमवारी जाहीर केली असून त्यामध्ये भारतीय संघाची 114 गुणांसह पहिल्या स्थानावरून तिसर्या स्थानावर घसरण झाली आहे. ऑस्ट्रेलियाचे 116 गुण आहेत, तर 115 गुणांसह न्यूझीलंड दुसऱ्या स्थानावर आहे.
आयसीसीने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार 2016 पर्यंतचा निकाल ताज्या अद्यतनातून काढण्यात आला आहे आणि त्यानंतरच्या निकालांच्या आधारावर रँकिंग तयार करण्यात आले आहे. याचा नुकसान भारतीय संघाला झाले आहे. दुसरीकडे, पाकिस्तानला पछाडत ऑस्ट्रेलियाने टी-20 रँकिंगमधेही पहिले स्थान मिळवले आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या स्थानावर असलेल्या पाकिस्तानी संघाला चौथ्या स्थानी ढकलले आहे. टी-20 रँकिंगमध्ये ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा अव्वल स्थान मिळवले आहे. पाकिस्तानी संघाने 27 महिन्यांनंतर क्रमवारीत पहिले स्थान गमावले आहे. पाकिस्तानी संघाने 10 गुण गमावले.
👉 India displaced from top in Tests for the first time since October 2016.
👉 Pakistan slip in T20I rankings after 27 months as No.1.
Details ⬇️ https://t.co/gfBjYsdFMW
— ICC (@ICC) May 1, 2020
दरम्यान, वनडे क्रमवारीत कोणताही बदल झाली नाही. पहिल्यांदा वर्ल्ड कप विजेत्या इंग्लंडचे पहिले स्थान कायम आहे, तर भारतीय टीम दुसऱ्या स्थानावर आहे. मात्र, इंग्लंडने भारताविरुद्ध 127 गुणांसह आघाडी वाढवली आहे. वनडेमध्ये भारतीय टीमचे 119 गुण आहेत. तिसऱ्या स्थानावर न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि पाचव्या स्थानावर ऑस्ट्रेलिया आहेत.